पाटोदा येथील आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून चेअरमनपदी गोपीनाथ बुलबुले यांची तर व्हाईस चेअरमन पदी शामराव राठोड
किनवट प्रतिनिधी
किनवट तालुक्यातील मोजे पाटोदा येथील आदिवासी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईसचेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून चेअरमनपदी गोपीनाथ बुलबुले यांची तर व्हाईस चेअरमन पदी शामराव राठोड यांची निवड झाली आहे.
सहकारी संस्थेच्या नोंदणीकृत उपविधितील तरतुदीनुसार किनवट तालुक्यातील मोजे पाटोदा खू येथील आदिवासी सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळातून सन 2022-23 ते सन 2027-28 या कालावधीसाठी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी 15 एप्रिल 2023 रोजी सहकार भवन येथे विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीत चेअरमन पदासाठी गोपीनाथ किशनराव बुलबुले यांनी तर व्हाईस चेअरमन पदासाठी शामराव राठोड यांनी नामांकन सादर केले होते. त्यांच्या विरोधात एकही नामांकन प्राप्त न झाल्याने चेअरमन पदी गोपीनाथ बुलबुले तर व्हाईस चेअरमन पदी शामराव राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकाऱ्यांने जाहीर केले.
या सभेला आदिवासी सहकारी संस्थेचे संचालक लक्ष्मण सिडाम, नागनाथ मेश्राम, शंकर गेडाम, काशिनाथ बुलबुले, उमाकांत मेश्राम, नागोराव वागतकर, सौ रंभाबाई तोडसाम, श्रीमती बालदेवी मडावी, वसंत राठोड, सुरेश चव्हाण हे उपस्थित होते.
या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी 2 एस एम बामणे यांनी काम पाहिले तर सचिव श्री मंडाळे यांनी त्यांना सहकार्य केले.
आदिवासी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गणेश वागतकर, रमेश मडावी, प्रेमसिंग राठोड, लक्ष्मण राठोड, बालाजी बटूर, गोपीनाथ सुरोसे, संजय चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.