तीन हजाराची लाच स्वीकारताना पोलीस हेडकॉन्स्टेबल पांढरे एसीबीच्या जाळ्यात अडकला;सापळा यशस्वी
किनवट/प्रतिनिधी: बालासाहेब नरोबा पांढरे, वय 56 वर्षे, व्यवसाय नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल/1805, पोलीस स्टेशन किनवट, जि. नांदेड रा. कमलाई नगर, हदगाव ता. हदगाव,जि. नांदेड यांनी लाच मगितल्याची तक्रार दि.18/03/2023 रोजी अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.प्राप्त झाल्यावरू दि. दि.20/03/2023 रोजी सापळा लावण्यात आला.यात रु.3,000/- ची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार, त्यांची पत्नी व दोन मुलांविरुध्द पोलीस स्टेशन किनवट येथे भारतीय दंड संहिता कलम 324,323, 504,506,34 अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात आरोपींना अटक न करता नोटीस देऊन सोडून दिले म्हणुन व यापुढे गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना रु. 10,000/- लाचेची मागणी करून रु. 5,000/- रु यापूर्वीच स्विकारले व उर्वरित रु. 5,000/- आज रोजी घेऊन येण्याचे सांगितले होते. आज रोजी लाचमागणी पडताळणी दरम्यान यापूर्वी रु. 5,000/- घेतल्याचे मान्य करून उर्वरित रु. 5,000/- पैकी तडजोडीअंती रु. 3,000/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
उपरोक्त लाचेची रक्कम रु. 3,000/- सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.
आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन किनवट जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
डॉ राजकुमार शिंदे पोलीस अधिक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री राजेंद्र पाटील,पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,नांदेड. पर्यवेक्षण अधिकारी,श्री. नानासाहेब कदम,
पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
सापळा/तपास अधिकारी यांच्या सह
पोहेकॉ संतोष वच्चेवार, सचिन गायकवाड, पोकॉ अरशद खान, चापोना मारोती सोनटक्के अँटी करप्शन ब्युरो, यूनिट नांदेड.
सापळा कारवाई पथक यांनी कार्यवाही केली.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
मोबाईल क्रमांक 9623999944
श्री राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड.
मोबाईल क्रमांक – 7350197197
*कार्यालय दुरध्वनी – 02262-253512*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*