राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ नांदेड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन प्रा. दशरथ रोडे यांच्या हस्ते संपन्न.
नांदेड:-(प्रतिनिधी)दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी मोर चौक, पावडेवाडी रोड नांदेड येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ कार्यालयाचा उद्घाटन समारोह मा. प्रा. दशरथ रोडे (महाराष्ट्र कार्याध्यक्ष) यांच्या हस्ते संपन्न झाला,प्रमुख उपस्थिती गोपाळराव लाड(महाराष्ट्र उपाध्यक्ष) हे होते.प्रमुख अतिथी म्हणून अशोक अनंत्रे, (पो.नि. भाग्यनगर पोलीस स्टेशन नांदेड), अशोक वायवळ ( मराठवाडा अध्यक्ष),ॲड. संघरत्न गायकवाड नांदेड (कायदेविषयक सल्लागार) विठ्ठल भाऊ देशमुख (प्रहार जिल्हाध्यक्ष नांदेड), प्रा. बालाजी मोरे (अध्यक्ष माणुसकी फाउंडेशन)सुखदेव चिखलीकर(बहुजन संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष) मा. बिरबल यादव (सामाजिक कार्यकर्ते), शेख अब्दुल अमीर, ,सौ गीता शंकर सिंह ठाकुर, सौ. वंदना गव्हाणे,सौ. विद्या वाघमारे,सौ. शुभांगी देबडवार,आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक देहवेडा माणूस अहोरात्र विचार करत होता, पत्रकारावर होणारे अन्याय, खोटे गुन्हे दाखल, पत्रकाराची हत्या बघून सारखे विचाराचे चक्र त्यांच्या डोक्यात फिरत होते. त्यांनी आपल्या विचाराची काही माणसे एकत्रित केली, आपले विचार मांडले, सर्वांना आवडले, त्या सर्वांनी मिळून पुरोगामी नावाच रोपटं 2017 साली लावलं, त्याच रोपट्याचं रूपांतर आज मोठ्या वृक्षात झालेलं आहे आणि तोच वृक्ष आज आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच वृक्षाच्या फांद्या आज पुरोगामी पत्रकारांच्या रूपातून सर्वत्र दिसत आहेत. त्या देहवेड्या माणसाचं नाव म्हणजेच संस्थापक अध्यक्ष मा. विजयजी सूर्यवंशी.
अवघ्या सहा ते सात वर्षात पुरोगामी पत्रकार संघाचं जाळं संपूर्ण भारतभर पसरविण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात पुरोगामी पत्रकार संघाची जबाबदारी दुसऱ्यांदा शंकर सिंह ठाकुर यांच्याकडे सोपवली, पुरोगामी पत्रकार संघाचे वाढते कार्य पाहून जिल्हा कार्यालय नांदेड येथे स्थापन करण्यात यावे असे आदेश दिले त्यानिमित्ताने नांदेड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी गोपाळराव लाड बोलताना म्हणाले की नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर यांचे कार्य अगदी उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे त्याचा आदर्श सर्वच पुरोगामी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षांनी घ्यावा.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश कोल्हे, संजय राक्षसे, विठ्ठल घाटे, जावेद शेख लहानकर, शिवदयालसिंह ठाकुर, प्रशिद्धी प्रमुख नरवाडे,शुभम ठाकुर,बल्लू ठाकुर आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर व नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष मारोती शिकारे यांनी मानले.