किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

(जिमाका) दि. 11 :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच 9 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या भव्य रक्तदान शिबीरास कै. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे डॉ. मुनेश्वर व टीम उपस्थित राहून रक्त संकलन करण्याचे काम केले.

नोडल अधिकारी एनसीडी डॉ. हनुमंत पाटील व आरएमओ ओपीडी डॉ. एच. के. साखरे यांच्या नियोजानामुळे या शिबिरास जिल्हा रुग्णालय नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी अशा एकुण 64 व्यक्तीने रक्तदान केले आहे. या शिबिरास डॉ. विजय पवार, डॉ. अवसरे, डॉ. चिखलीकर, डॉ कुलदीपक, डॉ. इंगळे, डॉ. अनुरकर, डॉ. सुमय्या खान, डॉ सुमित लोमटे, डॉ. साईप्रसाद शिंदे, डॉ. उमेश मुंडे, डॉ. शैलेश अग्रवाल, माधव शिंदे, श्री. भोसले, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, मेट्रन श्रीमती सुरेखा जाधव, अधिपरिचारिका श्रीमती विद्या बापटे, श्रीमती विशाखा, श्रीमती नारवाडे, श्रीमती इंगळे, श्रीमती मुंडे, श्री. अटकोरे, श्री. दुरपडे, श्री. जावेद तसेच रुग्णालयीन अधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर या भव्य आरोग्य तपासणी शिबिरास रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या आरोग्य तपासणी शिबिराअंतर्गत रुग्ण व त्यांची नातेवाईक यांच्यासाठी बीपी, शुगर व नेत्र तपासणी (डायबेटीक रेटीनोपथी ) आदी संबंधित आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराअंतर्गत रुग्ण व त्यांची नातेवाईक अशा एकुण 188 व्यक्तींचे तपासणी करण्यात आली. त्यापैकी बीपी, शुगर साठी 156 तर नेत्र तपासणी (डायबेटीक रेटीनोपथी ) साठी एकुण 32 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 156 पैकी 71 रुग्ण हे मागील कांही दिवस व वर्षापासून बीपी, शुगर च्या औषधोपचाराखाली असल्याचे आढळून आले.

तर 32 पैकी 4 रुग्ण हे संशयित असल्याचे आढळून आले. त्यांना आवश्यक ते उपचार करण्यात आले. या शिबिरास डॉ. रोशनारा तडवी (रा.अ.नि.का व्यवस्थापक) डॉ. शैलेश विभूते, डॉ. विखारुनिस्सा खान, नेत्र चिकित्सा अधिकारी एल. जी. चंदनकर, श्रीमती लता पवार, कु. मयुरी मंगरूळकर, डॉ. तिरुपती कदम, नेत्र समुपदेशक ज्योती पिंपळे , अधिपरिचारिका श्रीमती शिल्पा सोनाळे यांनी उपस्थित राहून तपासणी व उपचार केले. समुपदेशक एस. एम. सुवर्णकार यांनी रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना आहार व जीवनशैलीतील बदलासंदर्भात समुपदेशन केले.
000000

32 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.