शिक्षणप्रेमी गुलाब पाटील शिंदे यांच्या वाढदिवसाला केले शैक्षणिक साहित्याचे वाटप व मिळाला अध्यक्ष पदाचा बहुमान
लोहा-तालुक्यातील डेरला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ४ फेब्रुवारी शनिवारी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गुलाब रावसाहेब पाटील शिंदे (मो.९०४९४८७०००)यांच्या ३६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून इ.१ ली ते ७ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना सचित्र बालमित्र ,वही,पेन,या शैक्षणिक साहित्याचे शा.व्य.स.अध्यक्ष सुशिलकुमार शिंदे ,उपसरपंच प्रतिनिधी उमाकांत शिंदे ,माजी सरपंच प्रतिनिधी बालाजी शिंदे ,कामाजी कदम ,तंटामुक्तीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कदम ,शंकर कदम ,वैजनाथ कदम,नामदेव कदम ,योगेश शिंदे ,विजय हांडे,मारोती कदम ,दत्ता शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.प्रारंभी छ.शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांच्या स्वागतानंतर राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे यांनी प्रास्तविक करून सर्वांनी वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन केले .सामाजिक आत्मभान राखणारया शांत ,संयमी ,सकारात्मक,शिक्षणप्रेमी युवा नेतृत्वाला शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनवून वाढदिवसाची मोठी भेट दिली .यावेळी शिक्षिका सौ.मनिषा पवार,सौ.दिपाली सनपूरकर,सौ.अंजली भंडे,सौ.ज्योती हंबर्डे सह समितीचे सर्व सदस्य ,विद्यार्थी ,गावातील शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित होते ., सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक उत्तम क्षीरसागर तर आभार दत्तात्रय पांचाळ यांनी मानले .