*बिआरएस पक्षाच्या विस्तारासाठी तेलंगणातील मंत्री व आमदार खासदार यांचे झंझावाती दौरे* *नांदेड येथे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची ५ फेब्रुवारीला सभा*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.30.महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलण्यासाठी आता राज्याच्या राजकारणात आणखी एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला आहे.
तेलंगणातील सत्ताधारी पक्ष असलेला तेलंगाना राष्ट्र समिती टीआरएस या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यावर त्या पक्षाचे भारत राष्ट्र समिती हे नामकरण झाले आहे.
या पक्षाचा विस्तार करण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करून त्याचे ध्येय धोरणे
प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी या पक्षाचे नेते मंत्री खासदार आमदार इतर पदाधिकारी हे नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती तालुक्यात झंजावती दौरे करत आहेत.
दिनांक ५ फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव के सी आर यांची जाहीर सभा होणार आहे.या सभेच्या निमित्ताने तेलंगणाच्या पक्षाचे मंत्री, खासदार,आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदाधिकारी किनवट हिमायतनगर भोकर धर्माबाद बिलोली देगलूर या तालुक्यात सभा बैठका घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नांदेडच्या सभेला आमंत्रण देत आहेत.
नुकतीच भोकर तालुक्यातील किनी येथे बी आर एस या पक्षाची शाखा स्थापन करून येथून तालुक्यात पाय रोवण्याचा प्रयत्न सुरू झालाय.दिनांक २८ जानेवारी रोजी तेलंगणातील वन व कायदा पर्यावरण मंत्री इंद्रकरणरेडी यांनी भोकर येथे दौरा केला व त्यांनी येथील माऊली मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासोबत यु. पनेंदरराव माजी मंडल सभापती, रामकिशन रेड्डी जिल्हा परिषद अध्यक्ष,नारायण रेड्डी डीसीएम चेअरमन,गोवर्धन रेड्डी माजी मंडळ सभापती,एस.निंदिया सागर रेड्डी बी आर एस.नेता यांची यावेळेस उपस्थिती होती. ते भोकर मधील अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली व चर्चा केली. येथे झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात बोलताना मंत्री इंद्रकरण रेड्डी म्हणाले की मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या सरकारने अनेक विकासाची कामे केली शेतकरी, महिला,विद्यार्थी,मागासवर्गीय, सुशिक्षित बेरोजगार व अल्पसंख्याक यांच्या विषयी सर्वांगीण विकासाला सरकारने प्राधान्य दिले विशेष म्हणजे आमचे सरकार शेतकऱ्यांना पेरणीच्या दिवसात पेरणी करण्यासाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान देते.तसेच २४ तास शेतकऱ्यांना लाईट मोफत दिली जाते गोरगरीब लोकांना निराधार यांना महिना तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येते तसेच सिंचन क्षेत्रावर या सरकारचा मोठा भर आहे असे विविध पक्षाचे ध्येयधोरणे त्यांनी सांगितले यावेळी अनेक जण उपस्थित होते.
देगलूर,बिलोली,धर्माबाद,भोकर, हिमायतनगर,किनवट,माहूर,तालुक्यातील आदी सीमावर्ती,तेलगू भाषिक मोठ्या प्रमाणात असून या लोकांवर तेलंगणातील सरकारचा कामाचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे या ठिकाणी बी आर एस या पक्षाची पाळीमुळे रुजू शकतात व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये याचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.