किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदिवासी आघाडी राज्य उपाध्यक्षपदी आदिवासी नेते नारायणराव सिडाम यांची नियुक्ती

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदिवासी आघाडी राज्य उपाध्यक्षपदी आदिवासी नेते नारायणराव सिडाम यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिले.
नियुक्ती पत्रात अखिल भारतीय काँग्रेस आदिवासी आघाडीच्या मान्यतेने काँग्रेस पक्षाची विचारधारा व गांधी घराण्याचे नेतृत्व हेच आदिवासी समाजाला न्याय देऊ शकतात म्हणून आदिवासी समाजाला काँग्रेस पक्षाच्या संघटनेशी जोडण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्यातील काँग्रेस पक्षाच्या इतर संघटनेसोबत समन्वय साधून आदिवासी काँग्रेसचे कार्य वाढवावे असे नमूद करण्यातआले. सिडाम हे गेल्या पन्नास वर्षापासून सामाजिक राजकीय ,शैक्षणिक, क्षेत्रात कार्य करीत असून यापूर्वी काँग्रेस पक्षात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ,काँग्रेस पक्षाचे आदिवासी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष यासह विविध पदांवर कार्य केले असून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची सदर पदी नियुक्ती करण्यात आली. सिडाम हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख जातात त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे ,माजी मंत्री वसंतराव पुरके ,के.सी पाडवी ,पद्माकर वळवी ,आमदार सहसाराम कोरोटे मा. आमदार उत्तमराव गेडाम,कांग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .

198 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.