किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट या आदिवासी मतदारसंघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी जिल्ह्याचा खासदार म्हणुन प्रयत्नशिल राहिल- खा. चिखलिकर

किनवट ता.प्र दि १६ आपला मतदारसंघ अबाधित ठेऊन दुस-याच्या मतदारसंघाला दुर्लक्षित करणे मतदारसंघाला दुर्लक्षित करुन राजकारण करणारे हे लोकनेताचे लक्षण नाही कारण भोकर मतदारसंघाला १०० टक्के पिक विमा मिळतो इतर मतदारसंघाला का मिळत नाही हे पालकमंत्री म्हणून एका मतदारसंघापुरते मर्यादिन न राहता काम केले तर जनहित होईल असे अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता खा प्रताप पाटील चिखलिकर यांनी किनवट नगर परिषदे व्दारे आयोजित सत्कार संमारंभा प्रसंगी बोलतांना सांगितले. किनवट या आदिवासी मतदारसंघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी जिल्ह्याचा खासदार म्हणुन प्रयत्नशिल राहिल असा विश्वास खा चिखलिकर यांनी बोलतांना व्यक्त केला.
       आज दिनांक १६ जुन रोजी नांदेड चे खा. प्रताप पाटील चिखलिकर हे किनवट विधानसभा मतदारसंघाच्या दौ-यावर असतांना किनवट नगर परिषदेच्या वतीने त्यांना न पा सभागृहात सत्कार आयोजित केला त्यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले कि पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना विकासकामे करण्यासाठी किनवट दिसत नाही तर निवडणुकी पुरते ते किनवटकडे लक्ष देतात कारण लातुर जिल्ह्यात २३ विविध विभागीय कार्यालये तेथिल तालुक्यामध्ये आहे तर नांदेड जिल्ह्यात फक्त तीन ठीकाणी विभागीय कार्यालय आहे तर किनवट हा तालुका १५० एवढ्या अंतरावर असुन त्याकडे सदैव दुर्लक्ष हे ना.चव्हाण यांच्याकडुन करण्यात येतो असा आरोप खा.चिखलिकर यांनी लावला आहे.
       राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाल्याची बाब पत्रकारांनी निदर्शनास आणुन देऊन नियोजित आराखड्या प्रकारे राष्ट्रीय महामार्गाचे काम होत नाही किनवट शहरातच कसा ईको झोन लागतो, इको झोनच्या नावाखाली शहरातच १८ मिटर रुंद रस्ता होत आहे यासर्व बाबीची चौकशी व्हावी अशी मागणी केली असता मी स्वत; या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व संबधीत विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करुन शासनास चौकशी लावण्यात भागपाडु असे ही त्यांनी सांगितले.
       यावेळी त्यांच्या समवेत नांदेड जिल्हा भाजपा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, यवतमाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष नितिन भुतडा, आ. राजेश पवार, आ. नामदेव ससाणे, लक्ष्मण ठक्करवाड, गंगाधर जोशी, माधवराव पाटील उच्चेकर, सुनिल शिंदे, किशोर देशमुख, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपा ता अध्यक्ष संदिप केंद्रे, अजय चाडावार, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, अभय महाजन आदिंची उपस्थिती होती या दौ-यात त्यांनी किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ.केराम यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहुन उभयतास शुभाशीर्वाद दिले

114 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.