आकाशाएवढ्या संकटात सुद्धा कंचर्लावार परिवाराचा समाजसेवेचा भाव ; किनवट येथील समाजसेवी प्रसिद्ध सराफा व्यापारी स्वर्गीय श्रीकांत भूमन्ना कंचर्लावार (वय 48 वर्ष) यांच्या परिवारानी केले अवयव दान
किनवट: मेंदू मृत झाल्यानंतर जन्मदात्याच्या दु:खाने किंचितही खचुन न जाता त्यांच्या पत्नी मुलगा व मुलीने वडीलाचे अवयवदान करण्यासाठी पुढे येत समाजासमोर एक सामाजिक कार्याचा आदर्श ठेवला आहे. किनवट येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार (वय:48) यांना दुखापत झाली.त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मेंदू मृत झाल्याचे मंगळवारी (27/12/2022) सायंकाळी डॉक्टरांनी जाहीर केले.दान हे वडिलोपार्जित आणलेलां ठेवा असल्याने कुटूंबीयांनी अवयवदानासाठी सहमती दर्शविली.पत्नी लता,मुलगा अक्षय आणि मुलगी समिक्षा यांना डाॅक्टरांनी अवयवदानाद्वारे तुमच्या वडिलांचे पुनर्जन्म होईल असे सांगताच त्यांनी ते मान्य केले.2 डोळे,2 किडनी,यकृत,फुफुसे दान करण्यात आले. गुरुवारी (29/12/2022) सकाळी किनवट मध्ये त्यांच्या निवासस्थानापासुन त्यांची अंत्ययात्रा निघाली.
तरुण वयात अचानक इहलोकीची यात्रा संपुन निघून गेलेल्या श्रीकांत भुमन्ना कंचर्लावार यांनी मरावे परी कीर्ती रुपी उरावे हा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.या अवयवदानामुळे 8 जणांना जीवनदान मिळाले असुन या स्तुत्य कार्यासाठी कुटुंबियांचा रुग्णालया तर्फे सत्कार करण्यात आला.या अकस्मित निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून त्यांच्या अंत्ययात्रेस समाजातील व विविध स्तरातील अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती.
हा जो वडिलोपार्जित आलेलां दानाचा ठेवा आणि समाजसेवेचा भाव समस्त कंचर्लावार परिवरांनी असाच कायम स्वरुपी जपावा आणि ही दानाची वृत्ती वृध्दींगत व्हावी.