शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी आक्रमक
*शासन आपल्या दारी योजनेचा तालुक्यात उडाला बोजवारा*
*जिल्यात प्रशासक उदासीन नगदी मलई फस्त करण्यात नियम अटी धाब्यावर*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:धर्माबाद तालुका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यांतील शेतकऱ्यांची व शालेय वि्दयार्थ्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून नूतन तहसीलदार ही समस्या सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरले असल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी यांनी शिवसेना स्टाईल ने जाब विचारत गोर गरीब जनतेची दिशाभूल करणे थांबावा,शालेय वि्दयार्थ्यांची हेळसांड थांबवा असा इशारा दिला आहे.
शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्य सरकार राबवित असले तरी प्रत्यक्षात धर्माबाद तहसिल कार्यालयात मात्र गोर गरीब जनतेची कामे,शेतकऱ्यांच्या आडचनी,शालेय विद्यार्थी यांची प्रमाणपत्र जाणीवपूर्वक अडवली जात आहेत.राशन कार्ड मिळवण्यासाठी महिनोमहिने चकरा मारून न ही कामे होईनात त्यामुळे नागरिकांना केवळ चकरा माराव्या लागत आहेत.
या विषयावर तोडगा काढण्यासाठी तालुका प्रशासन लक्ष घालत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी यांनी आज आक्रमक भूमिका घेत अशी चालढकल वृत्ती वेळीच थांबवा गोर गरीब जनतेची दिशाभूल केली जात असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला.तालुक्यात रोज रात्री सुमारे दीडशे च्या वर वाहने अवैध वाळू उपसा वाहतूक करीत आहेत प्रशासन त्यावर गप्प का असा जाब देखील गणेश गिरी यांनी विचारला आहे.
सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास दिवसेनदिवस वाढतच आहे तो थांबविणे गरजेचे आहे.
स्थानीक प्रशासन गोरगरिब सर्वसामान्य जनतेची कामे, शेतकऱ्यांची प्रश्न बाजूला सारून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची पाठराखण करीत आहे वेळीच हा प्रकार थांबला नाही तर शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दाद मागू असेही शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी यांनी सांगीतले आहे.