शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घ्याव्यात-प्रकाश गब्बा राठोड
किनवट: राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी “महाराष्ट्रीयन ऑफ द इयर” या लोकमत वृत्त वहिनी वरील मुलाखती मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने किनवट जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी तत्काळ भाडेतत्त्वावर घेण्यात याव्या अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
या निवेदनावर प्रकाश गब्बा राठोड, रोहिदास सक्रू जाधव, मुकुंद नेमानीवार, राहुल गेमसिंग जाधव (नाईक), विलास प्रताप जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
51 Views