रानडुकराने उभ्या कापसाच्या पिकाचे केले अतोनात नुकसान; वनविभागा कडून आर्थिक मदत मिळावी- शेतकऱ्यांचे निवेदन
किनवट/प्रतिनिधी:किनवट टुडे न्युज
किनवट वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव तालुका किनवट येथील शेत सर्वे नंबर 73 /1 मध्ये रानडुकराने उभ्या कापसाच्या पिकाची अतोनात नुकसान केले आहे.याचा मोबदला वनविभागा कडून मिळावा आशा आशयाचे निवेदन वनपरिक्षेत्राधिकारी, वनपरिक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय किनवट यांच्याकडे अशोक रामलू कोडुरवार रा.पिपळगाव(की) यांनी दिले आहे.
एक हेक्टर जमिनीवर कापूस या पिकाची लागवड केली असता डुकराने कापसाचे झाडे मोडून बोंडाची नासधूस केल्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरीप पेरणी करण्यासाठी मी एसबीआय बँकेचे लोन घेतले होते. आता ते लोन कसे फेडावे? या विवंचनेत मी आहे तेव्हा या संकटातून मी कसा बाहेर पडू हे मला समजत नाही? त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असे निवेदनात नमूद असून नुकसान झालेले पिकाचा ताबडतोब पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
किनवट तालुका हा डोंगराळ असून जंगलाच्या कडेला शेती असल्यामुळे जंगली जनावरांचा वावर नेहमीच शेतामध्ये होत असलेला पाहायला मिळतो.तसेच अनेक शेतकऱ्यांवर अस्वल प्राण्याकडून हल्ले होत आल्याचे अलीकडच्या काळात सर्वांनी पाहिले आहेत.
होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी जंगलाच्या पायथ्याशी कुंपण करण्याची आवश्यकता आहे.