अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फाउंडेशन चा दिशादर्शक उपक्रम
जिवती :- सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याची आठवण आणि याच दसऱ्याच्या दिवशी लाखो अनुयायांना सोबत घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धार्मिक सिमोलंघन केले होते आणि आपल्या अनुयायांना विचारांची नवी दिशा आणि जगण्याची नवी जीवनपद्धती बुद्ध धमाचा स्वीकार करून करून दिली होती.
आणि याच घटनेमुळे शोषितांच्या, पीडितांच्या जीवनामध्ये एक नवीन विकासाची क्रांती झाल्याचे जगाने बघितले आहे. याच ऐतिहासिक दिवसाची आठवण येणाऱ्या पिढीला होत राहावी आणि यातून प्रेरणा मिळत राहावी म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फाउंडेशन जिवती च्या वतीने अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याजवळ जिवती येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री प्रा. जे एच गंजरे सर तरउदघाटक म्हणून श्री प्रा. सुग्रीव गोतावळे (मा उपसभापती पं स जिवती )हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सतीश राठोड सर (तालुकाध्यक्ष गोरसेना ),मा प्रल्हादजी मदने,मा. शरद वाठोरे सर, मा व्यंकटी कांबळे सर, मा. भानुदास जाधव,मा पांडुरंग भालेराव,श्री डवरे सर, श्री दत्ताजी दोरे सर,श्री दीपक गोतावळे सर, श्री यादव भालेराव श्री योगेश पटेवाले श्री संतोष इंद्राळे सर सौं. जयश्री गोतावळे (नगरसेविका )सौं. अनिता गोतावळे (मा पं स सदस्य )सौं अनिता तोगरे, सौं.रंजनाताई दोरे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी अनेक फुले, शाहू,आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारांचे अनुयायी उपस्थित होते.अनेकांची मार्गदर्शन पर भाषणे झाली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अंकुश गोतावळे (उपनगराध्यक्ष जिवती )यांनी केले, सूत्रसंचालन श्री रमाकांत जंगापल्ले यांनी तर आभारप्रदर्शन श्री व्यंकटी तोगरे यांनी केले.