पत्रकार आशिष शेळके यांनी वार्ड क्रमांक ५ मधून दाखल केले नामनिर्देशनपत्र.
सर्वांच्या आग्रहास्तव तसेच आपल्या वार्ड मध्ये काम करण्याच्या उद्देशाने नामनिर्देशनपत्र दाखल केले – आशिष शेळके
किनवट : तालुक्यात सर्वीकडे सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजे गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये सर्व पुढाऱ्यांचे व नागरीकांचे लक्ष लागलेले असते. अशा गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक ५ मधुन पत्रकार आशिष शेळके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आज दिनांक १ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल केले.
आशिष शेळके हमेशा आपल्या कार्याबद्दल व सामाजिक उपक्रमाबद्दल चर्चेत असतात. किनवट तालुक्यात तसेच गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये देखील आशिष शेळके यांनी विविध सामाजिक काम करुन तसेच नागरीकांच्या समस्या सोडवुन नागरीकांचे मने जिंकली आहेत. तसेच वार्ड क्रमांक ५ मध्ये मत मागण्यासाठी आल्यास त्यांना गटाराच्या पाण्याने व चिखलाने माखु त्यांची ही काही दिवसांपूर्वीची बातमी देखील खुप चर्चेचा विषय ठरली होती. तसेच वार्ड क्रमांक ५ मधील सर्व समस्यांसाठी सर्व महिलांना घेऊन ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकांना धारेवर धरले होते. तसेच रोड ची समस्या असो, नाली ची समस्या असो, रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या असो किंवा गोकुंदा ग्रामपंचायत मधील प्रत्येक वार्ड मध्ये पथदिव्यांची समस्या असो अशा सर्व समस्या विरोधात आशिष शेळके यांनी आवाज उठवला आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शेळके म्हणाले की, नागरीकांच्या आग्रहास्तव व आपल्या वार्ड मध्ये काम करण्याच्या उद्देशाने तसेच कोचिंग क्लासेस किनवट चे पदाधिकारी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव आज शेवटच्या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. किनवट तहसील येथे नामनिर्देशनपत्र दाखल करताना आशिष शेळके यांच्या सोबत शेख कलीम, शेख मुर्तुजा, शेख नाजिम, शेख मुबीन, सय्यद नजमु, शेख साजिद, आर्शद खान, सय्यद नदिम, दत्ता भालेराव, शेख अजमल, अरविंद मुनेश्वर इत्यादी उपस्थित होते.