किनवट शहरातील सर्वच रस्त्यावरील खड्डे बुजवा अथवा किनवट काँग्रेस तर्फे आंदोलन
किनवट/प्रतिनिधी: 31 ऑगस्ट रोजी श्री गणेशांची स्थापना होत आहे. किनवट शहरातील सर्वच रस्त्यावर खड्डे झालेले आहेत. तसेच श्री गणेश भक्त सर्व गणेश देखावे पाहण्यासाठी येत असतात. सोबतच नवरात्री उत्सव, श्री शारदा देवी उत्सव, शहरात मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. या समस्यावर शहरात तात्काळ उपयोजना करावी अशी मागणी किनवट काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी किनवटचे तहसीलदार व मुख्याधिकारी डॉक्टर मृणाल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यात मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते खड्डे आणि चिखल मुक्त करावे, रस्ते व नाल्यांची सफाई व्हावी, हायमॅक्स व पथदिवे बंद असलेले तात्काळ सुरू करावीत,पथदिवे जवळपास 60 टक्केनादुरुस्त आहेत ते दुरुस्त करण्यात यावेत, भाजीपाला बाजारात चिखलाचे साम्राज्य झाले आहे या ठिकाणी तात्काळ मुरूम चूरी टाकण्यात यावी व दुर्गंधी मुक्त करण्यात यावे, चिखल व पाण्याची डबके अधिक झाल्याने मच्छरांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, थंडी ताप यासारखे गंभीर आजाराचे रुग्ण आढळत आहेत.
विशेषता शहरी भागात विविध आजाराचे रुग्ण आहेत त्यावर उचित उपाययोजना करण्यात यावी यावर इतर मागणीचे निवेदन देण्यात आले आहे .
वरील समस्या बाबत त्वरित उपाययोजना न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर गिरीश नेमानीवार, अभय महाजन, दिलीप पाटील, लक्ष्मीपती दोनपेलीवार, खलिद भाई, जवाद आलम, स्वामी कलगुटेवार, संजय कोत्तूरवार, शरद कोतेपिलीवार, वसंत राठोड, इमरान खान, शादुल्ला अहमद शेख ,अब्दुल सत्तार खिच्ची ,शेख इमरान शेख चांद यांच्या स्वाक्षरी आहेत.