किनवट शहरासह तालुक्यात व ग्रामिण भागात सुरु असलेला पत्ते, मटका, जुगार तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडिया तर्फे जन आदोंलन करण्याचा इशारा
उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस स्टेशन कार्यालयास निवेदन सादर
किनवट तालुका प्रतिनिधी:-
किनवट शहरासह ग्रामीण भागात जोमाने सुरू असलेला मटका जुगार व पत्ते बिनदिक्कत सुरु आहे व पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे पोलिस प्रशासनाची या अवैध धंद्यां ना मुक संमती तर नाही ना असा प्रश्न नागरीकांना पडला आहे .
किनवट तालुक्यात जुन्या जिंनिग समोरील शेतात मोठ्या प्रमाणावर मटका जुगार खेळला जात आहे तसेच साठे नगर, बस स्थानक, भाजी मार्केट, राम नगर, बाबा रमजान गल्ली, धोबी गल्ली, शिवाजी नगर, रेल्वे स्टेशन परीसर, गंगा नगर गोकुंदा व इतर ग्रामीण भागात इंजेगाव, बोधडी, घोटी रोड इत्यादी ठिकाणी खुलेआम पणे मटका सुरू आहे या मध्ये दिवसभर केलेली कमाई गरीब मजुर, भाजीपाला विक्रेते, मिस्त्री, दुकानातील नोकर वर्ग रेतीवाले आपली सर्व कमाई लावुन कंगाल होत आहे व मटका जुगार चालवणारे व सहकार्य करणारे धनाड्य होत आहे व गरीब माणुस सर्व पैसा जुगारात लावुन उरलेल्या पैशाची दारू पिऊन घरी भांडत आहे या मुळे तरुण पिढी व संसार उद्धवस्त होवुन देशोधडीला लागत आहे त्या मुळे या अवैध धंद्यावर अंकुश लावुन कार्यवाही करण्यात यावी अन्यथा इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडिया जन आदोंलन केल्या शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर यावेळी इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाचे पदाधिकारी नसीर तगाले, शेख परवीन बेगम,राजेश पाटील , आशिष शेळके, गंगाधर कदम, सय्यद नदीम, शेख अतीफ, शेख मजहर, फिरोज पठान,प्रणय कोवे, रिहान खान, रमेश परचाके, बापुराव वावळे, सुहास मुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत