श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालयातील विध्यार्थी एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत निकालाची परंपरा कायम राखत 21 विद्यार्थी उत्तीर्ण.
किनवट/ता.प्रतिनिधी: श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) परीक्षेत निकालाची परंपरा कायम राखत यावर्षी 21 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्चांक गाठून सुयश प्राप्त केले आहे. त्याबद्दल एका कार्यक्रमात गुणवंताचा सत्कार घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पीआर वाडेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जावळे, डोळस, जोगी,पहुरकर, पोटफळे, राऊत पीर मोहम्मद, शेख इरफान,आदी उपस्थित होते.
प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
केंद्र शासनाकडून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी 1000 रुपये व इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असते. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते वही, पेन व हार देऊन सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील, सचिव अरुण कुलकर्णी, गटविकास अधिकारी अनिलकुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी आर.आर. जाधव केंद्रप्रमुख गंगाधर शेरलावार, मुख्याध्यापक पी आर वाडेकर ,सर्व शिक्षक वृंद ,सरपंच उपसरपंच व पालक यांनी गुणवंताचे अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमडी पहुरकर सूत्रसंचालन स्नेहल जाधव, नमरा शेख यांनी केले. अध्यक्षीय समारोप पी. आर. वाडेकर यांनी केला तर आभार प्रदर्शन सतीश राऊत यांनी केले.
गुणवंत विद्यार्थी: भावेश कोटरंगे, आरती येनगंटवार, रुद्र कदम, अदनान चाचणी, मोहसीन पठाण, श्रावणी शिरगुरवार, वैष्णवी खांडरे, आरती कारंजेवार, श्रेया जाधव, सृष्टी बोनतावार, श्रेया बोनतावार, हुसेन शेख, रेणुका मिसेवार, आरती कारंजेवार, आदिती पवार, पूजा कचरे ,प्रांजली पाटील, रोहित मडावी, धनश्री काळे, प्रसाद शिंदे, प्रथम दरलावार, यश मडावी आदी.