किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा ।। जिल्हा परिषद कन्या शाळेतील निराधार विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.27.जिल्यातील धर्माबाद शहरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.वाढदिवसाचे औचित्य साधून पंचायत समितीचे माजी सभापती मारोती पाटील कागेरु व शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

त्या पैकी जिल्हा परिषद कन्या शाळेतील १४ निराधार विद्यार्थ्यांना वार्षिक शालेय साहित्य देत ६ वह्या,पेन,कंपास, चित्रकला बुक,कलर,दप्तर अशी शालेय कीट तयार करून वाटप करण्यात आले. व ११५ विद्यार्थ्यांना २वह्या पेन इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांना बाराखडी खाऊ असे वाटप करणा-यात आले.जिल्हा परिषद कन्या शाळेला शैक्षणिक उठाव व लोकवर्गणी मधून शाळेचा कायापालट करण्यासाठी दानशूर व्यक्तींना शालेय व्यवस्थापन समिती च्या वतीने आव्हान करण्यात आले होते.

तरी त्यामुळे पंचायत समिती सभापती मारोती पाटील कागेरु यांच्या वतीने शाळेच्या संरक्षण जाळीचे ५० पुटं लांबी चे दोन बिंड्डल देण्याचे जाहीर केले.शिवसेनेच्या बिद्रवाक्य आहे की 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या नुसार याआधी पण तालुका शाखा शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळेला पाण्याची टाकी डिजिटल वर्गासाठी प्रोजेक्टर ही देण्यात आले होते.

यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रकाश जी मारावार नांदेड हे होते तर,प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव विधानसभा संघटक शिवराज भाऊ मोकलीकर,पंचायत समिती सभापती मारुती पाटील सागर तालुका संघटक गणेश गिरी,माजी शहरप्रमुख राजु शिरामणे,माजी शहरप्रमुख बालाजी बनसोडे, मनुरकर,गौराजी पाटील, मारोती पाटील ईळेगावकर,पांडुरंग पांचाळ,व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी शाळेतील शिक्षक माधव हिंमगिरे,शेख सर,जोशी मॅडम,सय्यद चंदा मॅडम, बेहेरे मॅडम, सह शिक्षक विद्यार्थी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी मुख्याध्यापक श्री.ना.सा. येवतीकर यांनी केले तर आभार मानले.

60 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.