उद्यपुर येथिल कैन्हैय्या लाल यांचे शिरच्छेद करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथे सर्वधर्मिय नागरीकांकडुन सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे रोष व्यक्त
किनवट ता. प्र दि ३० फेसबुकवर पोस्ट टाकल्याचा राग मनात ठेवुन उद्यपुर येथिल हिंदु धर्मिय व्यक्ती कैन्हैय्या लाल यांचे शिरच्छेद करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथे सर्वधर्मिय नागरीकांकडुन सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे रोष व्यक्त करण्यात आला.
किनवट शहरातील युवक व नागरीकांनी एकत्र येत सदर घटनेचा मोठ्यासंख्येने निषेध व्यक्त केला आहे तर निवेदनाव्दारे मागणी केली आहे कि, ज्या मानसिकतेतुन कन्हैय्या लाल यांची हत्या करण्यात आली ती मानसिकता देशात ज्या माध्यमाव्दारे व ज्या नागरीकांकडुन फोफावली जात आहे त्यांचा नायनाट करणे आवश्यक झाले असुन त्याकरिता योग्य प्रकारे कायद्याचे पालन केले गेले पाहिजे.
तर निवेदनाव्दारे मयत कन्हैय्या लाल यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी व ५० लक्ष रुपयांची मदत शासनाने करावी अशी हि मागणी करण्यात आली आहे तर सदर खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवुन दोषींना तत्काळ फाशी मिळवुन द्यावी अशी मागणी हि करण्यात आली आहे.
निवेदन सादर करण्याकरिता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत नागरीकांनी मार्च केले यावेळी निवेदन सादर केले त्यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार, शिवराज चाडावार, सामाजिक कार्यकत्या भावना दिक्षित, साई कासाडीवार, विधान नेम्मानिवार, साई पालेपवाड, यश सिरमनवार, बाबु जाटवे, विकास कोल्हे, मनोज जाधव, अजय एंड्रलवार, साई कोरगंटीवार, मुकुल निलगिरवार, मनोहर श्रीरामे, साई बोलसटवार, सोनु धोतरे, अविनाश बल्लेवार, विशाल पिन्नलवार, अनुराग चनमनवार, नरसिंग पब्बदवार, किरण भालेराव, नरेश संकनेनीवार, अतिष राजुरकर, देवराव निलगीरवार, स्वप्निल जाधव, मनिष ताडपेल्लीवार, राम वानखेडे, वेदांत भंडारे यांच्यासह अनेक युवकांची उपस्थिती होती.