मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन
नांदेड/प्रतिनिधी: नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नांदेड येथे केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
कुचकामी, निष्प्रभ व हुकूमशाही केंद्र सरकारच्या विरोधात देशाचे नेते राहुल गांधी हे सातत्याने आवाज उठवित असल्यामुळे सरकारने काँग्रेस अध्यक्षा सन्माननीय श्रीमती सोनियाजी गांधी व काँग्रेस नेते सन्माननीय श्री. राहुलजी गांधी यांना ईडीने नोटीस देऊन सतत चौकशीसाठी बोलावून त्रास देण्याचा केविलवाणा प्रकार करीत आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
246 Views