किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

डॉक्टर सुंकरवार यांच्याकडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या घृणास्पद, अमानवीय, निंदनीय कृत्याचा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे तीव्र शब्दात निषेध

किनवट /ता .प्रतिनिधी: डॉक्टर सुंकरवार यांच्याकडे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या घृणास्पद, अमानवीय, निंदनीय कृत्याचा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून साने गुरूजी रुग्णालय येथील सभागृहात पत्रकार परिषदेला सुरूवात झाली.

सर्व प्रक्रिया होईपर्यंत पीडितेच्या गरोदर पणाची पार्श्वभूमी कोणालाही माहिती नव्हती. याचा संबंध डॉक्टर सुंकारवार यांच्याशी आहे याची डॉक्टर ला तरी कशी कल्पना असणार? पण या प्रक्रियेत डॉक्टर हे डॉ.सुंकारवार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हा आरोप होत आहे. जो निराधार तथ्यहीन आहे. याउलट डॉक्टरानी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी जे करायला पाहिजे होते तेच केले व रीतसर प्रशासनाला कळवले सुद्धा. सदरील प्रकरणात डॉक्टरांनी योग्य ती वैद्यकीय पावले उचलले म्हणून रुग्णाचा जीव वाचला कायदेशीर पावले उचलली म्हणून प्रकरण उघडीस आले.

याप्रसंगी किनवट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ पत्की यांनी सम्पूर्ण डॉक्टरांच्या वतीने तयार करण्यात आलेली प्रेसनोट वाचवून दाखविली.


शनिवारी दि.7 मे रोजी सायंकाळी गुन्हा दाखल झालेला या घटनेचा आम्ही असोसिएशनने मंगळवारी प्रशासनाकडे निषेध व्यक्त केला. काही पत्रकार बांधवांचे आलेल्या फोनवर डॉक्टर्स असोसिएशन तर्फे निषेध नोंदवला व आमचे जेष्ठ सहकारी डॉक्टर बेलखोडे यांनी दुसऱ्याच दिवशी निषेध नोंदवला व त्याची वर्तमानपत्रांनी नोंद घेतली. आयएमए,निमा हिमा, व आय डी ए यांचे संयुक्त संघटन आहे.
झालेल्या घटनेचा तपशील असा आहे.पीडिता व तिची आई गुरुवारी दुपारी त्याचे फॅमिली डॉक्टर सूर्यवंशी कडे पोट दुखत आहे म्हणून गेले. तपासणीत मुलीला पाळी सुरू झाली नाही असे आईने सांगितले व त्यामुळे पोट दुखी ही पोटातील गोळ्या मुळे असेल असे प्राथमिक निदान करून तिला सोनोग्राफीसाठी पाठविले. सध्या वडील सोबत नसल्याने आईने उद्या सोनोग्राफी मी करतो सध्या गोळ्या द्या असे विनवले. डॉक्टरांनी ऍसिडिटी, पोट दुखी च्या गोळ्या दिल्या. पीडिता शुक्रवारी वडिलांसोबत सोनोग्राफी साठी डॉक्टर तोंडारे यांच्याकडे गेले असता त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून ती गरोदर असल्याची शक्यता त्यांना वाटली व यासाठी रेफरल लेटर आणण्यास सांगितले. वडील यासाठी डॉक्टर सूर्यवंशी कडे आले तेव्हा त्यानी स्त्री रोगतज्ञ कडे जाण्याचा सल्ला दिला.

पीडिता पालकांसोबत डॉक्टर बेलखोडे यांच्याकडे शुक्रवारी दुपारी गेली व आईने ती गरोदर असल्याची सांगितले. पण पाळी सुरू न होता गर्भधारणा कशी होते? असे तिने डॉक्टरांना विचारले तुम्ही मोठे डॉक्टर आहात तपासून सांगा चार दिवसापासून पोट दुखत आहे दोन दिवसापासून जास्त दुखत आहे आता तर खूपच दुखत आहे असे सांगितले. प्राथमिक तपासणीत बाळाचे ठोके ऐकू येत होते. करिता सोनोग्राफी करणे आवश्यक वाटल्याने रेफरल पत्र घेऊन डॉक्टर तोंडार यांच्याकडे पाठवले व ती गेली सुद्धा. पोटात आताही खूप दुखत असल्याने तिला वेदना शामक इंजेक्शन पायरॉक्स दिले.व परिस्थितीचे गांभीर्य जाणून सदर बाब डॉक्टर बेलखोडे यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातले तेव्हा ते नांदेड ला होते. महिला बालविकास अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मुलगी व आई-वडिलांचे कौन्सिलिंग करुया असे ते म्हणाले. थोड्यावेळाने डॉक्टर तोंडारे यांच्याकडून फोन आला व गर्भ 6 महिने 5 दिवसाचा होता असे कळविले. तेव्हा तिला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठवावे व रीतसर पोलिसांना कळवावे असे त्यांचे बोलणे झाले. पण दहा मिनिटानंतर डॉक्टर तोंडारे यांचा पुन्हा डॉक्टराकडे फोन आला व सदर मुलीचे सोनोग्राफी सेंटर च्या बाथरूम मध्ये बाळातपण सुरू झाले आहे व आपण ताबडतोब मदतीला यावे असे डॉक्टर तोंडारे म्हणाले.
अगदी चार पाच मिनिटात डॉक्टर बेलखोडे तेथे पोहोचले तेव्हा बाळातपण अर्धे झाले होते. व बाळ बाहेर आले होते व आईने ते धरले होते. डॉक्टर बेलखोडे यांनी ते पूर्ण करून मुलीची सुटका केली. रक्तस्त्राव जास्त होऊ नये म्हणून इंजेक्शन मिथार्जीन दिले व त्याच वेळी डॉक्टर तेलंग ही तेथे पोचले होते.मुलीला नंतर रितसर पत्र घेऊन पोलिसांना कळविण्यात गेले. तसेच डॉक्टर बेलखोडे यांनी अशा प्रकारे डिलिव्हरी झाल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना व्हाट्सअप वर पाठविले.

सर्व प्रक्रिया होईपर्यंत पीडितेच्या गरोदर पणाची पार्श्वभूमी कोणालाही माहिती नव्हती. याचा संबंध डॉक्टर सुंकारवार यांच्याशी आहे याची डॉक्टर ला तरी कशी कल्पना असणार? पण या प्रक्रियेत डॉक्टर हे डॉ.सुंकारवार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात हा आरोप होत आहे. जो निराधार तथ्यहीन आहे. याउलट डॉक्टरानी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी जे करायला पाहिजे होते तेच केले व रीतसर प्रशासनाला कळवले सुद्धा. सदरील प्रकरणात डॉक्टरांनी योग्य ती वैद्यकीय पावले उचलले म्हणून रुग्णाचा जीव वाचला कायदेशीर पावले उचलली म्हणून प्रकरण उघडीस आले.

सदरील प्रक्रियेत कुठल्याही डॉक्टरने गर्भपाताची गोळी किंवा इंजेक्शन दिले नाही. परंतु किनवट मध्ये अनेक ठिकानी आशा गोळ्या मिळतात.व बोगस बंगाली डॉक्टर कडून ते दिल्यात जातात. तरीही प्रशासनाने याकरिता रुग्णाच्या नातेवाइकांनी गर्भपातासाठी कुठुन गोळ्या घेतल्या तर नाही ना? याचा शोध घ्यावा. सर्व प्रयत्न करून रुग्णाचा जीव वाचला तरीही डॉक्टरावर आरोप होत असतील तर भविष्यात रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर धजावतील का? याचा सर्वांनी विचार करावा.ही विनंती.-डॉक्टर्स असोसिएशन किनवट

1,196 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.