मातंग समाजाला समशानभूमी नाकारले प्रकरणी भाकपा व समविचारी पक्ष संघटनाची दि.24 रोजी निषेध निदर्शने
नांदेड:-(मारोती शिकारे) मौजे बोर गाव जिल्हा सोलापूर येथील मातंग समाजाचे धनाजी साठे यांचा मृत्यू झाला असता गावातील सार्वजनिक समशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी मयत धनाजी साठे यांचे प्रेत घेऊन साठे कुटूंबीय आणि त्यांचे नातेवाईक जात असताना गावातील काही धर्माध आणि जातीयवादी लोक यांनी जातीयद्वेषभवणेतून मयत धनाजी साठे यांचा मृतदेह रोखले आणि साठे कुटुंबिय व त्यांच्या नातेवाईकांना सार्वजनिक समशानभूमीत जाण्यास मज्जाव केला असता साठे कुरुंबियांनी पोलिसात कळविले असता पोलीस गावात येऊन धर्माध व जातीयवादी लोकांना न रोखता उलट मयत धनाजी साठे आणि त्यांचे नातेवाईक यांना सार्वजनिक समशानभूमीत जाण्यास पोलीस गाडी समोर लाउन अडवणूक सुरू केली.गावातील धर्माध आणि जातीयवादी गावगुंड व आणि पोलीस यांचा निषेध नोंदवत साठे कुटूंबीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी मयत धनाजी साठे यांचा अंत्यविधी बोरगाव ग्रामपंचायत कार्यल्यासमोर केला.ही घटना संबंध महाराष्ट्रसह देशाला काळिमा फासणारी आहे. या धर्माध जातीयवादि घटनेच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पार्टी( युनायटेड)) व समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉम्रेड प्रा.सदाशिव भुयारे यांच्या नेत्रत्वाखाली दि.24 आगस्ट 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यल्यासमोर लोकशाही मार्गाने कोविड नियमांचे पालन करून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत तरी समविचारी पक्ष संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात स्कीर्य सहभाग नोंदवून निषेध वक्त करावा असे आवाहन पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे, महाराष्ट्रप्रदेश उपाद्यक्ष कॉ.प्रा.इरवंत रा.सुर्यकर,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष कॉ.प्रा.रहेमान सय्यद,मराठवाडा प्रवक्ता कॉ.संतोष शिंदे,मराठवाडा संघटक कॉ.अनतेशवरा ताई बंदुके,नांदेड जिल्हादयक्ष कॉम्रेड अंबादास भंडारे,नांदेड शहारादयक्ष कॉ.मंगेश चांदू देवकाबळे, नांदेडजिल्हा महासचिव कॉ.प्रा.देविदास इंगळे,भारतीय शिक्षक प्राध्यापक संघटन चे नांदेड जिल्हाध्यक्ष कॉ.प्रा.राज सुर्यवंशी आदींनी केले आहे.