प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त लोहा येथे गौरव सोहळा संपन्न
लोहा, नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी. आंबेगावे व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या आदेशानुसार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लोहा तालुका नेहमीच समाजहिताचे कार्य हाती घेत उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांचा गौरव करत असल्याचे दिसून येते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोहा येथे नुकताच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मान्यवरांचा गौरव सोहळा संपन्न झाला. लोहा शहरात ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून यादिवशी जन्मदिन असलेल्या काही सामाजिक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातून व पत्रकारितेतून समाजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा लोहा पंचायत समिती सदस्य युवा सेना जिल्हा समन्वयक नवनाथ उर्फ बापू रोहिदासजी चव्हाण यांचा जन्मदिनानिमित्त व त्यांनी केलेल्या एकंदरीत केलेल्या विधायक कार्याचा आढावा घेऊन त्यांचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे नांदेड जिल्ह्यातील व लोहा मतदार संघातील एकमेव युवा नेतृत्व ज्यांनी गत पाच वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील पाणी टंचाई, सर्वसामान्यांच्या समस्यांची अतिशय काळजीपूर्वक सोडवणूक केली. त्यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने गौरव सोहळा आयोजित केला होता. पत्रकार मोहन पवार व विलास सावळे या दोन्ही पत्रकारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पत्रकार विलास सावळे यांना नुकताच समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तसेच पत्रकार मोहन पवार यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन जन्मदिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने त्यांचाही भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली हा सन्मान सोहळा पार पडला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उत्तम महाबळे उपाध्यक्ष संजय कहाळेकर, सचिव प्रा.मारोती चव्हाण, सहसचिव तुकाराम दाढेल, कोषाध्यक्ष रमेश पवार, सहकोषाध्यक्ष संतोष तोंडारे, प्रसिद्धीप्रमुख शिवराज दाढेल यांसह प्रमुख पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत ०१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुक्याच्या वतीने जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नवनाथ (बापू) रोहिदास चव्हाण, लोहा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष केशवराव (मुकदम) चव्हाण, समाज भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार विलास सावळे, निर्भीड निपक्षपाती पत्रकार मोहन पवार यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.