किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बोधडी वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलातील वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी सोडले आहे . त्यामुळे वन्यजीवांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न भर उन्हाळ्यात सध्या तरी सुटला

किनवट ( प्रतिनिधी ) . तालुक्यातील बोधडी वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलातील वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करून त्यात टँकरद्वारे पाणी सोडले आहे . त्यामुळे वन्यजीवांचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न भर उन्हाळ्यात सध्या तरी सुटला आहे .
उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे उष्मांक वाढू लागला जिव लाही लाही होत आहे . वाढत्या उन्हामुळे जंगलात वन्यप्राण्यांची पाण्याची काही भागात सोय नाही . पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती होऊ नये यासाठी बोधडी चे वनपरिक्षेत्राधिकारी श्रीकांत जाधव यांनी उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहा . वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव ) श्रीनिवास लखमावाड यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल भागात वन्य प्राणी व इतर वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करून त्यात टँकर द्वारे पाणी टाकले जात आहे . पाणवठे भरून राहत असल्याने जंगलातील वन्यप्राणी मोठ्या संख्येने पाणी पीत आहेत . या पानवट्या मूळे वन्य प्राण्यांची मानवी वस्तीकडे येण्याला रोख बसला आहे . हरिण, नीलगाय ,रोही , सांभार ,रानडुक्कर, अस्वल, काळवीट , लांडगे, तरस, कोल्हे, वानर यासारखे वन्य प्राणी व मोर सारखे विविध पक्ष्यांचा पिण्याचा प्रश्न सुटला आहे .

322 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.