किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राज्यपालांजवळ आ. केराम यांनी वाचला किनवट माहूर तालुक्यातील आदिवासींच्या समस्यांचा पाढा..! “अडचणी सोडवण्यासाठी तातडीच्या आदेशांसाठी लेखी निवेदन”

किनवट, प्रतिनिधी
किनवट माहूर तालुक्यातील आदिवासी समाजाचा विविध समस्या बाबत आ. केराम यांनी महामहिम राज्यपालांकडे मतदार संघातील आदिवासी समाजांच्या विविध समस्यांचा पाढा वाचत आदिवासीं समाजास भेडसावत असलेल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी संबंधितांना लेखी आदेश मिळावेत यासाठी राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेवून लेखी निवेदन दिले.

आज.दि.१८ एप्रिल रोजी सकाळी 12 वा. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत नियोजित वेळेत आमदार भिमरावजी केराम यांनी ही मागणी केली. दरम्यान किनवट विधानसभा मतदार संघाचा आदिवासी समाजाचा एकमेव आमदार या नात्याने मतदार संघातील आदिवासी लोकवस्त्यांच्या खेडे गावांना दळण-वळणासाठी कुठलेही रोड रस्ते, विजेची सोय, आरोग्य, शिक्षण, पाणी, उद्योग, व्यवसाय नाहीत. अशा अनेक मुलभुत सोयीसुविधांच्या विकासापासून आदिवासी समाज राजकीय हिताचा बळी ठरून विविध विकास योजनापासून वंचीत आहे. परिणामी आदिवासी क्षेत्रबंधीत (पेसा) अंतर्गत मोडणाऱ्या आदिवासी खेडे गावांच्या व आदिवासी समाजाचा शैक्षणिक, आर्थीक, सरकारी नौकर भरती, उद्योग व्यवसायाचा माध्यमातुन तमाम आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी लक्ष पुरवुन या भागातील आदिवासींचा समस्यांची सोडवणूक करुन त्यांची तातडीने अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे असल्याने संबंधितांना तातडीने आदेशीत करण्याची मागणी आ. भिमरावजी केराम यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीदरम्यान लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच किनवट तालुका हा नक्षलप्रवण भागाच्या यादीतून वगळला गेल्याने असल्याने अनेकांना याचा फटका बसणार असल्याने या विषयावरही सखोल चर्चा करण्यात आली..

141 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.