आमदार.भीमराव रा. केराम यांनी माहूर गडावर दत्तप्रभुचे व महंत मधुसूदन भारती यांचे दर्शन घेऊन जनतेच्या सेवेस प्रारंभ
किनवट/प्रतिनिधी: आज नववर्षाच्या मुहूर्तावर किनवट ,माहूरचे लोकप्रिय आमदार.भीमराव रा. केराम यांनी माहूर गडावर दत्तप्रभुचे व महंत मधुसूदन भारती यांचे दर्शन घेऊन जनतेच्या सेवेस प्रारंभ केला.
तीन ते साडेतीन महिन्यापासून त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते किनवट/माहूर मतदार संघात फिरू शकले नव्हते.प्रदीर्घ उपचाराने आता त्यांची तब्येत ठीक असल्याकारणाने ते आता मतदार संघात लोकांच्या सेवेत बाहेर निघणार आहेत .त्यापूर्वी त्यांनी आज आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साडेतीन पीठांपैकी एक असलेले माहूरगड या ठिकाणी श्री दत्तप्रभू चे व महंत मधुसूदन भारती यांचे दर्शन घेऊन ते जनसेवेसाठी बाहेर निघणार आहेत.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत किनवट चे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,नेते धरमसिंग राठोड , प्रकाश कुडमेथे व भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.