ग्रामीण रुग्णालय माहूर येथील रिक्त जागा त्वरीत भरा. आमदार भीमराव केराम यांचा उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांना निर्वाणीचा इशारा. .
माहूर (शहर प्रतिनिधी) माहूर तालूका हा आदिवासी व अतिदुर्गम डोंगराळ भाग असून प्रामुख्याने ग्रामीण भागातील रूग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी कोरोना काळात आमदार भीमराव केराम यांनी जातीने लक्ष घालून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका, उपलब्ध करून दिल्या .तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर येथे प्रसूती कक्षाची भव्य इमारतीचे बांधकाम, प्राणवायू (अॉक्सिजन) संच,, ईत्यादींसह आवश्यक त्या सोईसूविधा उपलब्ध करुन दिल्या असून 2017पासून वैद्यकीय अधीक्षक ,वैद्यकीय अधिकारी, नेत्र चिकित्सक ,क्ष किरण तंत्रज्ञ, लीपीक वाहन चालक,सफाई कामगारांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना सोईसूविधा वेळेत मिळत नाही कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरली नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे, याबाबत केराम यांनी संबधीत विभागाला रिक्त पदे तातडीने भरा याबाबत लेखी सूचना दिल्या परंतू कूंभकरणी झोपेत असलेल्या संबंधित विभागाने आजपर्यंत रिक्त पदे भरली नाही, त्यामूळे हि बाब अतिशय गंभीर असून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. एकंदरीत माहूर ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्या यासाठी आमदार केराम यांनी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.