जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेचा निषेध – स्वप्निल पाटील
नांदेड प्रतिनिधी ….
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या गुन्हा दाखल व अटकेच्या कारवाईवर निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस स्वप्निल उर्फ बंटी इंगळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे
जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री ठाण्यात विवियाना मॉलमध्ये जाऊन ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी तिकिटाचे पैसे परत मागणाऱ्या प्रेक्षकांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. ‘हर हर महादेव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला जात आहे. याचाच निषेध म्हणून आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडला होता. विवियाना मॉलमध्ये झालेल्या या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिक्षित विजय धुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे आज अटकेची कारवाई करण्यात आली होती…
अशाप्रकारे व्यक्ती स्वातंत्र्य चा गळा दाबून सदरील शासन हे अधिकाराचा गैरवापर करत असल्याचे प्रतिपादन बंटी उर्फ स्वप्निल इंगळे यांनी केले तसेच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई अवेध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .