किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आशा व गट प्रवर्तकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, २४ मे रोजी देशव्यापी संप – कॉ.उज्वला पडलवार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड*:दि.21.कोविड -१९ च्या महामारीच्या संकटात रूग्ण व आरोग्य विभागातील दुवा असणाऱ्या आशा व गट प्रवर्तकांच्या मागण्याकडे राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे दि.२४ मे रोजी देशातील सीटू संलग्न फेडरेशनच्या सर्व आशा व गट प्रवर्तक एक दिवशीय संपावर जात असल्याचे पत्र फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार,सचिव कॉ.गंगाधर गायकवाड,जिल्हा कमिटी सदस्य कॉ.मारोती केंद्रे यांच्या शिष्ठमंडळाने मुख्य मंत्री,आरोग्य मंत्री,जिल्हाधिकारी नांदेड,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड,
महापालिका आयुक्त नांदेड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.

कोरोना महामारी मध्ये जिवाची पर्वा न करता प्रतिबंधात्मक मोहिमेत सक्रिय असणाऱ्या आशा व गट प्रवर्तक शासनाच्या अनेक सुविधा पासून वंचित आहेत. अनेक आशांच्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बेड व आॕक्सिजन सारख्या मुलभूत गरजा देखील मिळू शकल्या नाहीत.आरोग्य विभागातील इतर यंत्रणा व कंत्राटी कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी मानधनावर प्रत्यक्षात काम करणाऱ्या आशांना केवळ प्रतिदिन ३५ रूपये भत्यावर वेठबिगारी प्रमाणे काम करून घेतले जात आहे.
कोविड सेंटर,स्वॕब तपासणी,बाधित कुटुंबातील संपर्कातील सदस्यांची आरोग्य तपासणी तसेच लसीकरन केंद्रावर नियुक्ती देण्यात येत आहे. केलेल्या कामाचा कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात येत नाही. कामावरून कमी करण्याची धमकी देऊन आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आशांना बगर पगारी काम करण्यासाठी भाग पाडत आहेत.पन्नास लाख विमा लागू करून अमलबजावणी करण्यात सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

या जीवन मरणाच्या मागण्या फेडरेशनने अनेक वेळा शासनाकडे केल्या असून सरकारच्या वतीने दुर्लक्ष होत असल्यामुळे दि.२४ मे २०२१ पासून जिल्ह्यातील,राज्यातील व देशातील सर्वच आशा व गट प्रवर्तक संपावर जाणार असल्याचे सीटू संलग्न आशा व गट प्रवर्तक फेडरेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जिल्हा समन्वयक श्री सिध्दार्थ थोरात यांना तसे निवेदन देण्यात आले आहे.अशी माहिती कॉ.गंगाधर गायकवाड
सचिव -आशा व गट प्रवर्तक फेडरेशन नांदेड जिल्हा
(संलग्न सी.आय.टी.यु.)
मो.७७०९२१७१८८.यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

190 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.