राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किनवट तर्फे ऑक्सीजन काँसेंटरेटर चा लोकार्पण सोहळा संपन्न
किनवट/प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोविड निवारणासाठी स्थापन केलेल्या समिती मार्फत किनवट परिसरासाठी दहा ऑक्सिजन काँसेंटरेटर मशीन उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा माननीय आमदार श्री भीमरावजी केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी श्री कीर्ती किरण पूजार, तहसीलदार उत्तमराव कागणे आणि टी एच ओ डॉ. संजय मुरमुरे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी संघ परिवारातर्फे गेल्या वर्षभरात काय काय सेवा कार्य केले व पुढील वर्षाचे काय नियोजन आहे याची माहिती संघाच्या कोविड निवारण समितीचे प्रमुख श्री अनिरुद्ध केंद्रे यांनी दिली .सदर मशीन हे ककोरोना चा पूर्ण उपचार घेऊन घरी आलेल्या रुग्णांना जर घरी ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येईल. त्या प्रित्यर्थ मशीनचे नाममात्र शुल्क घेण्यात येईल. याप्रसंगी बोलताना कीर्ती किरण पुजार साहेबांनी या आपत्ती निवारणात शासना सोबतच सिव्हिल सोसायटीच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. माननीय आमदार श्री भीमराव केराम साहेबांनी समारोपात संघपरिवार प्रसिद्धीपासून दूर राहून कसे सेवा कार्य करतो त्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला डॉ. साबळे ,डॉ. उपासनी, डॉ. सुर्वे ,डॉ. पत्की ,डॉ. अमोल चिंनावार डॉ. संदीप जन्नावार ,प्रकाश टारपे ,विश्व हिंदू परिषदेचे विठ्ठलराव मच्छरलावार, नागनाथ बस्वदे ,गोविंद खोत ,विनोद सुंकरवार, इत्यादींची उपस्थिती होती .
मशीनची आवश्यकता असल्यास 9405375931आणि 9922658857या नंबर वर संपर्क साधावा.