पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेपत्ता दोन अल्पवयीन बालकांचा शोध घेवुन मुबंई येथुन २४ तासाच्या आत रोख मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि२0.जिल्यातील ग्रामीण रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दाखल गु.र.नं. ९६/२०२२ कलम ३६३ भादवि मधील बेपत्ता दोन अल्पवयीन बालकांचा मुंबई येथे शोध घेवून त्यांना मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ. सिध्देश्वर भोरे तसेच पोलीस निरीक्षक श्री.अशोक घोरबांड यांचे उपस्थितीत पालकांच्या ताब्यात देण्यात आले.फिर्यादी शंकर दुर्गाजी गोरे वय ४२ वर्षे रा. जुना कौठा नांदेड यांनी दिनांक १८/०२/२०२२ रोजी पो.स्टे.ला हजर येवून फिर्याद दिली की, दिनांक १७/०२/२०२२ रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास माझा मुलगा पियुष शंकर गोरे वय १५ वर्ष.व्यवसाय शिक्षण रा. जुना कोठा नांदेड हा घरा बाहेर गेला परत आला नाही.
त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी कोणतेतरी अमीश दाखवुन फुस लावुन पळवून नेले असावे तसेच आमच्या गावातील आशिष संतोष कांबळे वय १७ वर्ष रा. जुना कौठा हा सुध्दा काल दुपारपासुन गावामध्ये नसल्याने तो पण सोबत असावा असा अंदाज आहे.
वेगरे मजकुराच्या फिर्यादीवरून पो.स्टे. ला गु.र.नं.९६/२०२२ कलम ३६३ भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयात मा.पोलीस उप महानिरीक्षक श्री.निसार तांबोळी साहेब नांदेड परिक्षेत्र, मा.पोलीस अधिक्षक श्री.प्रमोदकुमार शेवाळे साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे साहेब, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी इतवारा श्री डॉ.सिध्देश्वर भोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री अशोक घोरबाड साहेब यांनी तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक आनंद बिचेवार मदतनीस बालाजी लाडेकर पोहवा/ब.नं.२१२७ यांना योग्य • मार्गदर्शन करुन सदर गुन्हयातील पिडीत अल्पवयीन मुलगा नामे पियुष शंकर गोरे हा त्याच्या घरातील रोख रक्कम सोबत घेवून गेल्याची माहिती मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक साहेब यांनी तपास अधिकारी पोउपनि बिचेवार व मदनिस लाडेकर यांचे पथक तयार करुन रेल्वे स्टेशन, बस स्टॉप पाईंट, लक्झरी पॉईंट इत्यादी ठिकाणीचे प्रवासीची माहिती घेवून व सी.सी.टी.व्ही. कॅमेरे चेक केले.सायबर सेल नांदेड यांचे तांत्रीक सहाय्य घेवुन संशयीत मुलाचे टॉवर लोकेशन मालाड मुंबई येथे मिळून आल्याने मा.पो.नि.घोरबांड साहेब यांनी मा. पोलीस अधिक्षक साहेब श्री प्रमोदकुमार शेवाळे व उप विभागीय पोलीस अधिकारी साहेब इतवारा डॉ. श्री सिध्देश्वर भोरे साहेब यांना तपास पथक मुंबई येथे पाठविण्याची परवानगी मागितली असता तात्काळ परवानगी मिळाली व तपास अधिकारी पोउपनि आनंद बिचेवार सोबत बालाजी लाडेकर पोहकाँ/२१२७ असे दिनांक १८/०२/२०२२ रोजी मुंबईला रवाना झाले.मुंबई येथील नॉर्थ सायबर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक चंदनशिवे साहेब व अमलदार यांच्या सहाय्याने बेपत्ता दोन्ही अल्पवयीन मुलांचा शोध घेतला असता ते बोरीवली भागात मिळून आले. अल्पवयीन मुलगा पियुष शंकर गोरे याचे जवळ नगदी ५,००,०००/- रुपये व एक नवीन iPhone कंपनीचा १३ Pro. Gold किंमत १,०२,००/- रुपये मिळून आले. अल्पवयीन मुलगा पियुष शंकर गोरे यास ऐवढे पैसे कोठून आणले असे विचारले असता त्याने सांगितले की,मी माझ्या घरुन हे पैसे आणलेले असुन मी मुंबईला फिरण्यासाठी व शॉपींग करण्यासाठी मित्राला सोबत घेवुन आलो असल्याचे सांगितले आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवुन आज दिनांक २०/०२/२०२२ रोजी तपास अधिकारी पोउपनि बिचेवार व बालाजी लाडेकर पोहेकॉ/२१२७ हे नांदेड येथे परत आले. दोन्ही अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांच्या पालकांनी भावनिक होवुन पोलीस प्रशासन यांचे विशेष आभार मानुन त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मा.पोलीस उप महानिरीक्षक श्री निसार तांबोळी साहेब नांदेड परिक्षेत्र,मा.पोलीस अधिक्षक,नांदेड श्री प्रमोदकुमार शेवाळे साहेब यांनी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अशोक घोरबांड, तपास अधिकारी पोउपनि आनंद बिचेवार, पोहेकॉ/२१२७ बालाजी लाडेकर यांचे विशेष कौतूक केले आहे.