किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कॉग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझा मावळा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रतिपादन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.20.नांदेड जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासुन काँग्रेस विचाराची मुळे खोलवर रुजली आहेत.देशाचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी माणून राजकारण केले. तोच वारसा पुढे चालवत काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत.शेवटी कोणताही पक्ष हा कार्यकर्त्याच्या जोरावरच मोठा होत असतो.नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता हा माझा लढवय्या मावळा असुन त्यांच्या जीवावर मी कोणतीही लढाई लढण्यास मागे-पुढे पाहणार नाही,असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येस आज येथे केले.याचवेळी त्यांनी शिवजयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

येथील कुसुम सभागृहामध्ये नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमीटीच्या वतीने आयोजित केलेल्या डीझीटल नोंदणी शुभारंभ, नवनिर्वाचित पदाधिकारी व नगरसेवक यांचा सत्कार आणि काँग्रेसपक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होते.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर,माजी खा.तुकाराम रेंगे पाटील,माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी खा.सुभाष वानखेडे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजुरकर, आ.माधवराव जवळगावकर,आ.मोहनअण्णा हंबर्डे,आ.जितेश अंतापुरकर, प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ,मराठवाडा डीजीटल प्रमुख अमर खानापुरे,माजी आ. वसंतराव चव्हाण,माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ.अविनाश घाटे,जि.प. अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर,महापौर जयश्रीताई पावडे,जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,सरचिटणीस संजय लहाणकर,डीजीटल नोंदणीचे जिल्हा प्रमुख नारायण श्रीमनवार, शहर प्रमुख विजय येवनकर, उद्योजक मारोतराव कवळे,ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे,बी.आर. कदम,शेषेराव चव्हाण,जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे,समाज कल्याण सभापती ॲड.रामराव नाईक,कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर,स्थायी समीती सभापती किशोर स्वामी, विजय चव्हाण,बंडु चव्हाण, नामदेवराव आयलवाड,कवीता कळसकर,अनुजा तेहरा, मीनलताई खतगावकर,संगीता पाटील डक,शिल्पा नरवाडे, रोहिदास जाधव,पप्पु कोंडेकर, विजय देवडे,मारोती किरकन, आदिंची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना पालकमंत्री अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले की,नांदेड जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे.

त्यामुळेच नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये 52 पैकी तब्बल 33 जागा एकट्या काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा कामगिरीचा आढावा घेतांना नांदेड जिल्हा राज्यात नंबर 1 वर असल्याचा आपणास अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत हाच विजयाचा आलेख आपण कायम ठेवला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. डीजीटल सभासद नोंदणीमध्ये ज्या तालुक्याचे उत्कृष्ट काम आहे.त्यांना पालकमंत्री म्हणुन अधिकचा निधी देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
विरोधी पक्षाकडे माणसे नाहीत.

त्यांना इतर पक्षातून उमेदवारांना आयात करावे लागते.आयात केलेल्या उमेदवाराच्या जोरावर देगलूरमध्ये पंढरपुरची पुनर्रावती करण्याच्या वल्गना दलबदलुने केल्या.परंतु जनतेने त्यांची त्यांना जागा दाखविली गत खेपेला या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार 22 हजारांने विजयी झाला होता.

त्यात वाढ होऊन जितेश अंतापुरकर यांचे मताधिक्य 42 हजारापर्यंत पोहचिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमात माजी खा.भास्कराराव पाटील खतगावकर,माजी खा.सुभाष वानखेडे,माजी खा.तुकारम रेंगे पाटील,आ.अमरनाथ राजुरकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, अभिजीत सपकाळ,अमर खानापुरे,अविनाश घाटे,हणमंत पाटील बेटमोगरेकर,ओमप्रकाश पोकर्णा यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.

या कार्यक्रमात नायगाव,अर्धापुर व माहुर येथील नवनिर्वाचित पदाधिकारी आणि नगरसेवक यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यासोबतच भाजपा,शिवसेना व मनसे या पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले निलेश बालासाहेब देशमुख बारडकर,ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे, योगेश चिल्कावार,मोहन ठाकरे, नर्सीग आठवले,राजु मुलंगे, सदाशिव पाटील यांच्यासह अर्धापुर,हिमायनगर व मुदखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला.या कार्यक्रमास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

296 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.