माहूर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून फिरोज दोसानी तर काँग्रेसकडून प्रा.राजेंद्र केशवे निवडणूक रिंगणात आमने-सामने
माहूर/प्रतिनिधी: आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी माहूर नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीतून काँग्रेसचे विलास भंडारे व शिवसेनेच्या आशाताई निरधारी जाधव यांनी आपले नाम नामनिर्देशन पत्र परत घेतल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी समोरासमोर टक्कर(लढत)होणार असून राष्ट्रवादीकडून माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी व काँग्रेस कडून प्राचार्य राजेंद्र केशवे हे या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी समोरासमोर आले आहेत. यात काँग्रेसकडे 6 तर राष्ट्रवादीकडे 7 असे पक्षीय बलाबल असून शिवसेनेकडे 3 विजय उमेदवार असल्यामुळे शिवसेना कोणाकडे झुकेल त्याचाच नगराध्यक्ष होणार आहे. शिवसेनेचे नेते नगराध्यक्षपद कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. हे येणाऱ्या 14 तारखेला समजेल.
508 Views