अ.भा.जनवादी महिला संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; मॉल व किराणा दुकानात दारू विक्रीचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दि.३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.
मॉल व किराणा दुकानात दारू विक्री करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा अन्यथा जमसं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल अस इशारा जिल्हा कमिटिच्या वतीने देण्यात आला आहे.
अर्थव्यवस्था सुधारण्याच्या भंपक बहाण्याने मॉल व सुपर मार्केट तसेच किराणा दुकानात दारू विक्री करण्याचा जनविरोधी निर्णय राज्य सरकारने घेतला असून तो अत्यंत घातक व अनेक महिलांचे संसार उध्वस्त करणारा आहे.
तो निर्णय तात्काळ रद्द करावा ही मागणी जनवादी महिला संघटनेच्या नांदेड जिल्हा कमिटीने केली आहे.
निवेदनावर जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड,शहर निमंत्रक कॉ.लता गायकवाड,सीटूच्या राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार,कॉ.मीना आरसे,शीलाताई ठाकूर,विजयमाला कलवले,ज्योती दवणे,शोभा हटकर,लता सुर्यवंशी,ऊषा आढाव,दिक्षा बहादूरे,सी.एन.पांचाळ,रब्बाना बी,जे.बी.डावरे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.