किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

“भारतीय स्वातंत्र्य आंदोलन व सामाजिक आंदोलनातील मूल्यांची पुनर्मांडणी करणे गरजेचे आहे.”_

हिमायतनगर: *हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या हिंदी व रासेयो विभागाच्या वतीने संयुक्त आभासी पटलावर भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने ” भारतीय स्वतंत्रता आंदोलन के मूल्य बोध और हिंदी” या विषयावर एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली आभासी व्याख्यान घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेश सागर येथील डॉ. हरीशिंह गौर विद्यापीठाचे डॉ. पंकज सिंह, तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे रासेयोचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शिवाजी भदरगे व स्टॉफ सेक्रेटरी डॉ. डि.के. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.*_

_*या दीड तास चालणाऱ्या व्याख्यानामध्ये सुरूवातीला संयोजकांकडून मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले. व तसेच प्रास्ताविक विचार हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. एस. एन. भदरगे यांनी मांडले. तदनंतर कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना हरी सिंह गौर विद्यापीठाचे डॉ. पंकज सिंह म्हणाले की, आपल्या देशांमध्ये स्वातंत्र्याचे दोन आंदोलने झाली. त्या दोन्ही आंदोलनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण या देशांमध्ये जी गुलामी व्यवस्था होती‌ त्या व्यवस्थेतून आपल्या लोकांना बाहेर काढून इतरांच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक मूल्यावर आधारित इक्वलिटी समानता स्थापित करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला. ते क्रांतीकारी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले तसेच शाहू जी महाराज, राममोहन राय, धोंडो केशव कर्वे आदींच्या विचार मूल्यांना आधोरेखित केले. समाजसुधारकांच्या सामाजिक आंदोलनाचे व राष्ट्रीय आंदोलनाची मूलतत्त्व समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हक्क आदीवर आधारित आहे. यावर आधारित भारतीय संविधानाची चौकट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केली. म्हणून आज आपला देश स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत एकसंघ, अखंड व अबाधित राहू शकला. व्याख्यानाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय आंदोलना संदर्भामध्ये बोलताना सांगितले की या देशांमध्ये इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. त्यांनी आम्हाला गुलाम बनवले. म्हणून आपल्याला उद्या च्या उज्वल भविष्यासाठी जातीपाती, धर्मपंत हे भेदभाव विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. आज आपल्या पुढे मोठा प्रश्न आहे की, 30 टक्के जनता दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांना दोन वेळचे पोटभर जेवण भेटत नाही तर त्यांना घर कसे मिळणार? या देशातील महात्मा गांधींचे स्थान केवळ स्वातंत्र्यच लढ्या इतकेच मर्यादित आहे काय? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार. परंतु आज प्रश्नच विचारणं बंद झालं आहे. या देशातील मूठभर स्वार्थी लोकांच्यामुळे आम्हाला गुलामी पत्करावी लागली. यासाठी त्यांनी टिपू सुलतान यांचे उदाहरण दिले. म्हणून आज आपल्या साठी अंतर्गत लढाई ही स्वातंत्र्य लढाई इतकीच महत्वाची आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी स्वातंत्र्यवीरांच्या विचारांचे पुनर्मूल्यांकन होने आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी अशा मोठ मोठ्या स्वातंत्र्यलढ्यातील देशभक्तांच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. आणि दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींचे योगदान व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील योगदान तसेच हिंदी भाषेवरील त्यांची निष्ठा अधोरेखित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशावर निष्ठा होती म्हणून, त्यांनी सर्वसमावेशक भारतीय संविधान निर्माण कले. शेवटी त्यांनी बोलताना सांगितले की, भारतीय स्वातंत्र्य आंदोलन व सामाजिक आंदोलनातील मूल्यांची पुनर्मांडणी करणे काळाची गरज आहे.*_
_*व्याख्यानाचा शेवट अध्यक्षीय समारोपाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी केला. या आभासी व्याख्यानाचे सुंदर असे आयोजन महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी भदरगे व तसेच डॉ. एल. बी. डोंगरे यांनी केले.*_
_*सूत्रसंचालन डॉ. शेख शहेनाज यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. वसंत कदम यांनी मानले. या व्याख्यानाला महाविद्यालयाचा संपूर्ण स्टॉप व कार्यालयीन कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यातील अनेक मित्र मंडळी आभासी पटलावर उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. प्रस्तुत व्याख्यान शासनाने घालून दिलेल्या covid-19 च्या सर्व नियमाचे पालन करून घेण्यात आले.*_

554 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.