किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ उदया 24 रोजी नांदेड बंदची हाक

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी संजीवकुमार गायकवाड*

उमरखेड येथे कार्यरत असलेले व नांदेड येथील मूळ निवासी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीने डॉक्टर हनुमंत धर्मकारे हत्या विरोधी संघर्ष समितीच्या वतीने नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे.

दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी नांदेड येथील मूळ रहिवासी असणारे व उमरखेड येथे कार्यरत असलेले डॉक्टर हनुमंत धर्मकारे या डॉक्टरांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय निंदनीय असून या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या प्रकरणात तब्बल 10 दिवस उलटून गेले असले तरी यातीलप्रमुख आरोपी अटक झालेली नाही.
या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाही. म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी व इतर मागण्यासाठी डॉक्टर हनुमंत धर्मकारे हत्या विरोधी संघर्ष समिती नांदेड च्या वतीने जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व सामाजिक संस्था च्या कार्यकर्त्यांच्या वतीने दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी राज्य सरकारचे व प्रशासनाचे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी व या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व सामाजिक, राजकीय पक्ष संघटनांनी सहभागी व्हावे असे आव्हान डॉक्टर हनुमंत धर्मकाररे हत्या विरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

367 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.