*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि. नांदेड शहरातील तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण अधिनियम २०१९ अंतर्गत जिल्ह्यास्तरीय समीतीद्वारे तृतीयपंथी यांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची तरतूद आहे त्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलवर आॅनलाईन रित्या प्राप्त असलेल्या ३४ अर्जापैकी ७ तृतीयपंथी यांना जिल्हाप्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नांदेड आणि कमल फाउंडेशन नांदेड यांच्या प्रयत्नातून आज दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा नियोजन विभाग नांदेड येथे ओळखपत्र देण्यात आले.जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.अशा प्रकारचे ओळखपत्र मराठवाड्यात प्रथमच देण्यात आल्यामुळे ईतर जिल्ह्यांच्या तुलनेत नांदेड जिल्हाने आघाडी घेतली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी सहायक आयुक्त तेजस माळवदकर.समाज कल्याण कर्मचारी दवनेसह कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने तसेच तृतीयपंथी उपस्थित होते.या कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर म्हणाले की ओळखपत्रापुरते मर्यादित न राहता तृतीयपंथी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना रोजगार संधी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा देता येईल यावर प्रामुख्याने विचार करून त्यानुसार शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल तसेच तृतीयपंथी यांनी ओळखपत्रासाठि आॅनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत असे आवाहन ही त्यांनी केले तर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर म्हणाले की, तृतीयपंथी यांना देण्यात आलेले ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्रे व त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहित नांदेड जिल्ह्याने मराठवाड्यात आघाडी घेतली आहे.येणार्या काळात जास्तीत जास्त तृतीयपंथी यांना ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्रे देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
कमल फाउंडेशन यांच्या वतीने खुप महिनत घेण्यात आली आहे.