कोरोना लसीकरणासाठी जिवती तालुक्या बाहेरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
नेटवर्क समस्यां मुळे स्पॉट नोंदणी करून लसीकरण देण्यात यावी अशी मागणी
जिवती/प्रतिनिधी
जिवती येथे सोमवारपासून 18 वर्षा वरील नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करायची असल्याने तालुक्या बाहेरील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. त्यामुळे येथील केंद्रावर तालुक्यातील नागरिकांपेक्षा बाहेरच्या तालुक्यातील नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
यामुळे तालुक्यातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. ज्योती येथील विदर्भ महाविद्यालयां मध्ये गुरुवारपासून 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरण याचा शुभारंभ करण्यात आला आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक होती परंतु जिवती तालुक्यातील नेटवर्कची समस्या असल्याने तालुकावाशीया कडून अल्प प्रमाणात नोंदणी करण्यात आली. याचाच फायदा चंद्रपूर ,बल्लारशा, राजुरा, गडचांदूर लगतचे नागरिक घेत आहेत.
जिवती येथे एकच लसीकरण केंद्र देण्यात आले आहे ऑनलाइन नोंदणीमुळे तालुक्या बाहेरील लोकांनी जीवतीला पसंती दिली परंतु हा रिस्पॉन्स बघता तालुक्यातील नागरिकांसाठी ही जनजागृती आहे. येत्या आठवडाभरात तालुक्यात केंद्र वाढवण्यात येणार आहेत मात्र नागरिकांना कुठेही नोंदणी करून घेता येतेअसे डॉ.अंकुश गोतावळे वैद्यकीय अधिकारी कोविड केअर सेंटर जिवती यांनी सांगितले.
जिवती तालुक्यात नेटवर्क ची मोठी समस्या आहे. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करण्यास अडचण येत आहे. याचा फायदा लगतच्या तालुक्यातील नागरिक घेत आहेत. जिवती तालुक्यातील नागरिक लसीपासून वंचित राहू नये म्हणून स्पॉट नोंदणी करून लसीकरण देण्यात यावी अशी मागणी येथील जनता करीत आहे.