इंदिरा गांधी यांच्या निर्णयाने देशाचा इतिहास बदलला -प्राचार्य बेंबरेकर
किनवट टुडे न्युज नेटवर्क।
भरताची प्रथम स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ भारताच्या राजकारणावर वर्चस्व गाजवले नाही तर जागतिक राजकारणावर आपली छाप पाडली म्हणून त्यांना आयर्न लेडी असे संबोधले जाते देशाला कणखर नेतृत्व देण्याचे अलौकिक कार्य त्यांनी केले देशाच्या विकासामध्ये त्यांचे फार मोठे योगदान असून त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण, आणीबाणी ऑपरेशन ब्लू स्टार, अनुचाचणी असे व इतर निर्णय घेऊन त्यांनी देशाचा इतिहास बदलला असे प्रतिपादन बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित इंदिरा गांधी यांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी गौरवोदगार केले . सर्वप्रथम इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा पुरुषोत्तम येरडलावार ,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.सुलोचना जाधव,प्रा. लता पेंडलवार, सुधीर पाटील आदी उपस्थित होते.