घोटी येथील बंद पडलेले हातपंप चालू करा-राजू सुरोसे पाटील
किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
किनवट: घोटी येथील बंद पडलेले हातपंप चालू करण्याच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट यांना देण्यात आले.
ग्रामपंचायत मौजे घोटी येथील हातपंप तीन वर्षापासून बंद आहे त्यातील जिजामाता चौक येथील हातपंपाला भरमसाठ पाणी आहे.तरीपण तेथील पूर्णपणे हातपंप ग्रामपंचायतच्या ताब्यात असून सुद्धा ते बसवण्यामध्ये टाळाटाळ करत आहेत.आणि जिल्हा परिषद शाळा घोटी येथील सुद्धा हातपंपाला पाणी असून सुद्धा हातपंपाचे खालील पाईप विनाकारण काढून ग्रामपंचायतीने ताब्यात घेतले.शाळेतील विद्यार्थी आणि अंगणवाडी सेविका यांना सुद्धा अडचण भासत आहे.वरील ठिकाणचे हातपंप तात्काळ चालू करून देण्यात यावेत या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी किनवट यांना देण्यात आले.
निवेदनावर राजू सुरोसे पाटील संतोष मिरासे उल्हास राठोड कृष्णा मेश्राम संजय पावडे भगवान गरड किशोर चटलेवार माधव मेश्राम निकेतन सुरोसे वैभव गरड अभिजित गरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.