किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राष्ट्रवादीच्या स्वराज्य ध्वजाचा कोल्हापूर-कर्नाटक सीमाभागात दौरा

स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील युवावर्गाला प्रेरणास्थान मिळालं असून नव्या स्वराज्य ध्वजगीताने राज्यातील युवावर्गाला नवे ध्येय दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची संकल्पना आणि आयोजनातून सिद्ध झालेली स्वराज्य ध्वज यात्रा दिवसेंदिवस यशस्वी वाटचाल करते आहे. तब्बल सोळा दिवस उलटूनही स्वराज्य ध्वज यात्रा अथकपणे नागरिकांपर्यंत महाराष्ट्राचा वारसा पोहोचवत आहे. महाराष्ट्राची वीररसपूर्ण गौरवशाली परंपरा देशभर पोहोचवण्यासाठी गेले पंधरा दिवस सातत्याने स्वराज्य ध्वज मोहिमचे वाहन राज्यातील सर्व जिल्हयात तसेच देशातील इतर राज्यांत फिरत आहे. आज ध्वज यात्रेच्या कोल्हापूर-कर्नाटक मुक्कामात शेकडो स्थानिकांनी मोठ्या उत्साहात स्वराज्य ध्वजाचे स्वागत केले. बेळगावच्या वल्लभ गढ येथे ध्वज मोहिम जाऊन पोहोचली. येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेलके, नगरसेवक शिवाजी मंडोलकर, प्रकाश मरागले, सूरज कंबरकर, ॲड. सुधीर चव्हाण, संतोष कृष्णचे, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, हृषीकेश सौंदलगेकर आदी उपस्थित होते.

पुढील टप्प्यात ध्वज मोहिम कोकण प्रांतात प्रवेश करत आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग किल्ला आणि रत्नागिरीतील भगवती गडाला ध्वज मोहिम भेट देणार आहे.
आजपर्यंत स्वराज्य ध्वज रथ अडचणींची पर्वा न करता प्रवास करत आहे. राज्यातील प्रवासाचा हा अखेरचा व तिसरा टप्पा सुरू आहे. गेले दोन आठवडे कोविड साथरोगाच्या काळातही कोविडसंबंधीचे सर्व आवश्यक नियम पाळून अत्यंत नियोजनबद्ध रितीने स्वराज्य ध्वज मोहिम राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून महत्त्वाकांक्षी प्रवास करत आहे. पंचवीस जिल्ह्यांमधून स्वराज्य ध्वजाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय अनुभव घेतला आहे.

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, मुसळधार पाऊस, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने आपला यशस्वी प्रवास सुरूच ठेवला आहे. आतापर्यंत राज्यातील यशस्वी प्रवासाशिवाय राज्याबाहेरील तीन राज्यांमध्ये देखील हि ध्वज यात्रा पोहोचली आहे.

सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वज संकल्पनेला ध्वज मोहिम यात्रेचं मूर्त स्वरूप दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा-वृंदावन, केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होत आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधिक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/ या संकेतस्थळावर पाहाता येईल. अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या क्रमांकावर संपर्क करा.

280 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.