नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरील बहुपक्षीय व एकदिवशीय निषेध धरणे आंदोलनातील 13 मातंग नेत्यावर पोलिसांनी केले गुन्हे दाखल.
नांदेड/प्रतिनिधी: गऊळ ता.कंधार जि.नांदेड येथील मातंग समाजावरील लाठीचार्ज व साहित्यिसम्राट आण्णाभाऊ साठे पुतळाविटंबना प्रकरणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुपक्षीय व एकदिवशीय निषेध धरणे आंदोलन दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते.यात 13 मातंग नेत्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अगदी शांततेच्या मार्गाने समारोप झालेल्या आंदोलनातील प्रमुख नेत्यांवर खालील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचून जनमानसात बदनामी होत आहे.तर प्रशासनाच्या विरोधात समाजात तीव्र असंतोष पसरला आहे.
उपरोक्त धरणे आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृह मंत्री महाराष्ट्र राज्य यांना माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून पोलिस अधिक्षक कार्यालयालयाच्या आदेशाने सताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांना पचनी पडाव्या आशा निवडक डाव्या कार्यकर्त्यांसह उत्कृष्ट नामांकन मिळविणा-या ” मातंग नऊ महत्वाच्या नेत्यांवर नांदेड पोलिसांनी सूडभावनेने दखल घेतली असून ते क्रमांशा खालील प्रमाणे आहेत.
1) प्रा.रामचंद्र भरांडे 2)प्रा.कॉ.सदाशिव भूयारे 3)मारोती दादा वाडेकर 4)गणेश दादा तादलापूरकर 5)कॉ.गंगाधर गायकवाड 6)सुर्यकांत दादा तादलापूरकर7)रणजित दादा बा-हाळीकर 8)परमेश्वर बंडेवार साहेब 9)शिवाजी दादा नुरंदे 10. नागोराव आंबटवार 11. इरवंत सूर्यकर 12. भालचंद्र पवळे 13. अंबादास भंडारे
वरील नऊ पैकी दोन नेते अर्थातच प्रा.सदाशिव भूयारे व परमेश्वर बंडेवार हे जातीने कार्यक्रमात हजर नसतानाही त्यांची नावे नांदेड पोलीस प्रशासनाने खोट्या गुन्ह्यात गोवली आहेत.
वरील मातंग नेतृत्वावर पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथे under section 154 Cr.P.C. FIR No.0336
1) भारतीय दंड संहिता 1860 कलम 188.
2) भारतीय दंड संहिता 1860 कलम 270
3) भारतीय दंड संहिता 1860 कलम 341
4) भारतीय दंड संहिता 1860 कलम 34
5) महाराष्ट्र Covid – 19 विनियमन 2020 कलम 11
6) आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51(b)
7) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 135. प्रमाणे दिनांक 21/09/2021 रोजी रात्री 11.17 वाजता खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि यास नांदेड जिल्हा प्रशासन पूर्णतः जबाबदार आहे.असे त्यांचे म्हणणे आहे.
गऊळ येथील पिडीत मातंग बांधवावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ज्यांनी केले आहे त्यांनाच गुन्हेगार ठरविणे हे महाराष्ट्रातील पुरोगामी शासनाला निश्चितच शोभणारे नाही म्हणून या सर्व प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेशन विभागा मार्फत चौकशी करण्यात यावी व गऊळ अत्याचार आंदोलनातील सर्वच मातंग समूहातील लोकांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ रद्द करावेत.आणि आंदोलनात केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा समविचारी पक्ष मातंग संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे समजते.तसेच मा.मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना अनेक कार्यकर्ते निवेदन पाठवर आहेत.याची दखल मा.मुख्यमंत्री व गृहमंत्री काय निर्णय घेतात या कडे समाजाचे लक्ष लागून आहे.