लोहयात माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम यांच्या घरी दरोडा ; युवा नेते सचीन मुकदम यांना बांधुन हल्ला करून लॅपटॉप , १५ ग्राम सोने सह १ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास
लोहा पोलीसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल;
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केली घटना स्थळाची पाहणी
—————————————-
लोहा / प्रतिनिधी शिवराज दाढेल लोहेकर
लोहयात माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक केशवराव मुकदम ( चव्हाण ) यांच्या बिडवई नगर येथील राहत्या घरी दि.४ आॅगस्ट रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास धाडसी दरोडा पडला असुन चोरट्यांनी केशवराव मुकदम यांचे जेष्ठ पुत्र युवा नेते सचीन मुकदम (चव्हाण) यांना बांधून त्यांच्यावर हल्ला करून घरातील लॅपटॉप व १५ ग्राम सोनेसह १ लाख ९० हजाराचा ऐवज लंपास केले आहे.
सचिन मुकदम ( चव्हाण) यांनी याबाबत लोहा पोलीसांत तक्रार दाखल केली असून तक्रारीत असे नमूद केले की, – दिनांक ४-९- २०२१ रोजी दिवसभर माझे मोंढा येथील दिनेश ट्रेडिंग कंपनी दुकानावर काम करून संध्याकाळी नऊ वाजता सुमारास घरी गेलो आई वडील भाऊ आजी असे जेवण करून मी माझ्या पहिल्या मजल्यावर माझ्या रूम मध्ये झोपी गेलो. दिनांक ५- -९ २०२१ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास बाजूच्या रूममध्ये खडखड असा आवाज आला त्यामुळे मी रूमचे दार उघडले असता अचानक चार जण माझ्या रूम मध्ये घुसले व माझ्या गळ्याला चाकू लावला व मला हिंदी मध्ये म्हणाले तूच बाहेर ये ज्यादा आवाज मत कर असे म्हणून मला थापड बुक्क्यांनी मारहाण केली माझ्या अंगावर कपडे काढले व माझे हात- पाय दोरीने बांधून माझ्या तोंडामध्ये गोळा बोंबला कपाटाची चावी कुठे आहे ते सांग असे म्हणत मला मारहाण करू लागले. माझ्याकडे कपाटाची चावी नाही असे मी त्याला सांगितले . त्यांनी त्यांच्या जवळील हायड्रोक्लोराइड परॉक्साईड गेल माझ्या हाता पायाला लावून मला बांधले त्यांनी रूम मधील पलंगाची चौकशी करून नीचे लाईट लगा आणि उघडून त्यामध्ये सामानाची पाहणी करून सर्व सामान अस्वस्थ केले दरम्यान घरच्या खालून कोणीतरी एकाचे फोन आला व निचे लाईट लगा हे असे म्हणले होते .
त्यावेळी त्या चौघांनी रूम मधील एकूण सोन्याच्या अंगठी दोन प्रत्येकी सात ग्रॅम वजनाच्या किमतीचे 42 हजार रुपये, सोन्याचे तोडे, वाले दोन नग 16 ते 40 हजार रुपये, लॅपटॉप सीरियल कंपनी चा 70 हजार रुपये ,तीस हजार रुपये रोकड असे एकूण १ लाख ९०हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पळून गेले .
अशी फिर्याद दिली असता लोहा पोलीसात अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३९५ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे हे करीत आहेत.
लोहा शहरातील मुकदम (चव्हाण )घराणे हे एक प्रतिष्ठीत व्यापारी, जमिनदार,व राजकीय घराणे असुन फिर्यादी सचीन मुकदम चे आई वडील हे लोहा न.पा.चे विद्यमान नगरसेवक आहेत , तसेच आजोबा कै. व्यंकटराव मुकदम हे लोहा व कंधार पंचायत समितीचे सभापती होते तसेच आजी जिजाबाई मुकदम या लोहा न.पा. च्या माजी नगराध्यक्षा आहेत. काका माणिकराव मुकादम हे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.
लोहा शहरांच्या मध्ये वस्ती मध्ये मुख्य रस्त्यावर त्यांचे घर असून त्यांच्या घरी दरोडा पडल्यामुळे लोहा शहरात मोठी खळबळ उडाली असून सदरील घटना सकाळी शहरातील नागरिकांना कळताच अनेक नागरिकांनी तिकडे धाव घेतली.
तसेच या दरोड्याची दखल पोलीस प्रशासनाने ही दखल घेतली असुन जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी मुकदम यांच्या घरी भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली.