धर्माबाद येथील पोलीस स्टेशनं मार्फत आज गणपती व पोळा हे सण शासनाच्या चौकटीत साजरे करा-सोहन माच्छरे; शांतता कमेटीच्या बेठकीत अनेकांनी केल्या सूचना
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.4.जिल्यातील धर्माबाद तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागात काही दिवसातच पोळा व गणपती उत्सव सणाचे आगमन होणार असून त्यानिमित्त धर्माबाद शहरातील पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांच्या अध्यक्षते खाली आज एक शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती.त्यावेळी उपस्थित पञकार व गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना धर्माबाद पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे साहेब यांनी असे सांगितले की सर्वांनी गणेश उत्सव व पोळा हे सण एकदम शासनाच्या चौकटित राहून साध्या पद्धतीने साजरे करुण धर्माबाद पोलीस प्रशासनास सहकार्य करा असे आव्हान यावेळी केले.
सध्या संपूर्ण देशात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व सण उत्सव बंद होते.यामुळे पोळा व गणेश उत्सव या पार्श्वभूमीवर एक शांतता कमिटीची एक बैठक आयोजित केली होती यावेळी शहरातील सर्व गणेश मंडळाचे सदस्य व शांतता कमिटीच्या सदस्या व पञकार बांधवाची उपस्थितीत होती.त्यांनी उपाय योजना पोलीस प्रशासनास सांगितल्या त्यानंतर प्रशासना तर्फे यावर काय काय उपाय योजना कराव्या लागतील ह्याचे निर्देश उपस्थित सोहन माच्छरे साहेब यांनी दिले.त्याच बरोबर या पण वर्षी बैलपोळा व गणेश उत्सव हे आपण सर्वांनी घरगुती सण म्हणुन साध्या पद्धतीत साजरे करावे अशी विनंती सूचना पोलीस प्रशासनाने उपस्थित मंडळास दिल्या..
उपस्थितांना शेतकऱ्यांचा मानाचा समजला जाणारा सण बैलपोळा प्रत्येक शेतकऱ्यांनी आप आपल्या घरगुती सना प्रमाणे साजरा करावा असेही यावेळी विनंती केली
यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वनाथ पाटील बन्नाळीकर,धर्माबाद तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष दत्तहारी पाटील कदम चोळाखेकर,पंचायत समितीचे सभापती मारोती कागेरू,नरेंद्र रेड्डी,ड्रा.लक्षिमन केशटवार,बाबू पाटील,नगरसेवक निलेश पाटील,अंकुश भोसले,रवी पोटगंटीअण्णा,रमेश गौड,शाम झंवर,दत्ताहरी आवरे पाटील चिकणेकर,विजय राठोड,मारोती माकणे,श्रीनिवास दासवाड, गंदलवार (बाब्स टेलर),एल.एल.निदानकर,धर्माबाद नगर पालिकेचे मुख्यधिकारी नीलम कांबळे पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे,महावितरणचे पांडे,पोलीस उपनिरीक्षक पॅन्तोजी साहेब,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाडीकर,साहेबराव नालेवाड,व चंपतराव कदम,अन्नेवार,स्वामी,साहेब यासह सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते,तालुक्यातील सन्माननीय पत्रकार संजय कदम,शिवराज गाडीवान,मिसाळेसर,लक्ष्मन तुरेराव,मुबशीर,लड्डा,कृष्णा तीमापुरे,धनराज गायकवाड,किशन कांबळे,तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व पोलीस पाटील, सरपंच,यावेळी उपस्थित होते.