किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

खा.हेमंत पाटील यांनी घेतला हिमायतनगर येथील कोव्हिड परिस्थितीचा आढावा

👉🏻बोरगडी (तांडा) येथील वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याना दोन दिवसात चार लाखांची मदत

👉🏻पैनगंगा नदी पात्रात 2 दिवसात पाणी सोडण्यात यावे अशे जिल्हाधिकारी यांना खासदारांनी फोनवरून सूचना दिल्या

हिमायतनगर/ नागेश शिंदे
तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता आज हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयात एक आढावा बैठक घेतली यावेळी हिमायतनगर तालुक्यातील वाढत्या कोरो ना संख्येबाबत उपविभागीय अधिकारी व हिमायतनगर चे तहसीलदार गायकवाड साहेब , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी डी गायकवाड शिवसेना तालुकप्रमुख रामभाऊ ठाकरे,नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्याकडून सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेण्यात आला व बोरगडी (तांडा) येथील एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यु झालेल्या शेतकऱ्याना नांदेड जिलहाधिकारी यांना बोलून दोन दिवसात चार लाखांची मदत देण्यास सांगितले व नंतर तालुक्याला लागून असलेल्या पैनगंगा नदी पात्रात 2 दिवसात पाणी सोडण्यात यावे अशा सूचना हिंगोली जिल्हाधिकारी व नांदेड जिल्हाधिकारी यांना फोनवरून दिल्या

यावेळी हदगाव येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डा प कर साहेब, हिमायतनगर चे तहसीलदार गायकवाड साहेब ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी.डी .गायकवाड, हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे ,नगराध्यक्ष कुणाल राठोड ,उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, पंचायत समिती विस्तार अधिकारी मांजरमकर साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यव्रत ढोले युवा सेना तालुका प्रमुख विशाल भाऊ राठोड ,शिवसेना शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार यांच्यासह आदी जन यावेळी उपस्थित होते

200 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.