किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे किनवट तालुक्यासह इस्लापुर परिसरातील विविध मागण्याच्या घेऊन दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार

किनवट ता.प्र दि २३ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे किनवट तालुक्यासह इस्लापुर परिसरातील विविध मागण्याच्या घेऊन दिनांक ३ सप्टेंबर २०२१ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज तहसिल कार्यालत सादर करण्यात आले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या इस्लापुर जिल्हा परिषद गटाअंतर्गत परिसरातील विविध मागण्या व सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडवण्याची मागणी करत केंद्र सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अणुषंगाने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व इस्लापुर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते व पदाधिका-यांची उपस्थिती होती.
तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे रास्तारोको आंदोलन करत असल्याचे निवेदन सादर करतांना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे मागणी करण्यात आली आहे कि, इस्लापुर येथुन होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ठ कामाची चौकशी करुन बोगस कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात यावे, राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने चालु असुन ते तत्काळ पुर्ण करावे जेणे करुन या मार्गावर होणारे अपघात टळतील राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
इस्लापुर परिसारातील रेल्वेचे अंतर्गत बोगदे ज्यामध्ये पावसाळ्यात पाणी साचते ते दुरुस्त करुन नागरीकांना रास्ते मोकळे करुन द्यावे व शेतक-यांना पिक विमा मंजुर करावा या व अशा विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षा तर्फे सादर करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, सभापती अनिल क-हाळे पाटील, विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील, आदिवासी नेते जयवंत वानोळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.पंचफुलाबाई शिवराम जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पाटील घोगरे, युवक अध्यक्ष अजित साबळे, बाळासाहेब शेरे, डॉ भगवान गंगासागर, डॉ सुभाष वानोळे, शे.जब्बार तल्हारीकर, बंटी भाऊ आडे, बालाजी बामणे, संतोष जाधव, निर्गुण पाटील कदम, रोशन खान पठान , सुरज जाधव, ग्रा.प. सदस्य सावन जयस्वाल, कुलभुषण जोंधळे यांची उपस्थिती होती व सादर केलेल्या निवेदनावर स्वाक्ष-या देखिल होत्या.

95 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.