कुंडलवाडी येथील भूमीपुत्र प्रा. रमेश बिरमोड यांना पीएच.डी. प्रदान
कुंडलवाडी प्रतिनिधी (धर्मपुरे गणपत)
कुंडलवाडी येथील रहिवासी मिलिंद प्राथमिक व विद्यालय शाळेचे माजी विद्यार्थी रमेश पंढरीनाथ बिरमोड यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर ने अभियांत्रिकी शाखेतील सर्वोच्च विद्यावाचस्पती म्हणजेच पीएच.डी. पदवी नुकतच बहाल केली.
सध्या नागपूर विद्यापीठातील लक्ष्मीनारायण इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलाजी येथे रसायन अभियांत्रीकी विभागात कार्यरत असलेले प्रा. रमेश बिरमोड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिवर्सीटी लोणेरी,रायगड येथून बी.टेक. तर आय.आय.टी. मुंबई येथून एम.टेक. पूर्ण करून एल.आय.टी. नागपूर येथे प्राध्यापक म्हणून रुजू होऊन मार्गदर्शक डॉ. श्रींकात दवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ” मॉडलिंग सिमूलेशन एंड एक्सपेरीमेंटल स्टडी ऑफ मेंबरेन डिस्टीलेशन ” या विषयावर संशोधन करून ९ प्रकारचे मेंबरेन बनवून आरोग्यदायी पिण्यालायक पाण्याचे शुध्दीकरण करण्याचे नवे तंत्र ही संशोधीत केले या त्यांच्या यशाबद्दल मिलिंद प्राथमिक व विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच मित्र परिवारआणि कुंडलवाडी शहरात सर्व स्तरातून कौतूक होत आहेत.