किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे नवोदय विद्यालय चाचणी परीक्षेला तालुक्यातील 176 विध्यार्थ्यांपैकी 140 विद्यार्थी हजर

किनवट (ता. प्र.)बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे नवोदय विद्यालय चाचणी परीक्षेचे आयोजन 11 आॅगस्ट 2021रोजी करण्यात आले .तालुक्यातील विविध शाळेतील 176 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते. त्यापैकी 140 विद्यार्थी हे परीक्षेला हजर होते आणि 36 विद्यार्थी अनुपस्थिती होते. नवोदय विद्यालय चाचणी परीक्षेचे केंद्र संचालक प्रा. अनिल पाटील ,बाह्रय निरीक्षक रामा उईके यांनी परीक्षेचे काम पाहिले .
सदर परीक्षा हि शांततेत व सुरळीतपणे पार पडली. बैठे पथक म्हणून पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जाधव यांनी काम पाहिले .एकूण 15 हॉल मध्ये परीक्षा घेण्यात आली एका हॉल मध्ये बारा विद्यार्थ्यांना बसवण्यात आले. सदरील परीक्षा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
बळीराम पाटील महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मास्क वाटप करून सेनिटायझर करण्यात आले व विद्यार्थ्यांचं टेंपरेचर मशीन ने तापमान तपासण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये सोडण्यात आले. मास्क वाटप कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डाॅ. गजानन वानखेडे, मुक्त विद्यापीठाचे प्रमुख प्रा. बोकडे प्रा. ज्ञानेश्वर चाटे, श्री किशन कर्णेवार सर ,श्री मारोती मुलकेवार सर ,जाधव सर , मिलिंद लोकडे ,सुधीर पाटील ,श्रीराम खिल्लारे ,श्री गेडाम आदींनी सहकार्य केले

181 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.