नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व नऊ विधानसभा निवडणुकीत मांतग समाज आपक्ष उमेदवार उभे करणार -मा.आ.अविनाश घाटे
नांदेड /प्रतिनिधी; संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुका जाहिर झाल्या आहेत.महाविकास आघाडी व महायूतीचे उमेदवार व जागा जवळजवळ वाटप करण्यात आलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणुक व नऊ विधानसभा या ठिकाणी एकही उमेदवार मातंग समाजाचा दिला नाही म्हणून मा.आ.अविनाश घाटे यांच्या निवासस्थानी मातंग समाजाची बैठक झाली यामध्ये सर्वानुमते लोकसभेसाठी व नऊ ठिकाणी विधानसभा आपक्ष उमेदवार उभे करणार आसल्याचे मा,आ,अविनाश घाटे यानी भावना व्यक्त केली आहे.
मातंग समाजाचा राजकारणात वेळोवेळी वापर करुन घेतला जात आहे.आम्हाला कोणीही गृहित धरुन स्वतः चा व त्या पक्षाचा फायदा करुन घेत आहेत.मला बिलोली-देगलुर विधानसभा काँग्रेस पक्षाकडुन उमेदवारी जाहिर होईल या दृष्टिकोनातून मि पूर्ण मतदारसंघ घरोघरी फिरून मतदाराना काँग्रेस पक्षाबद्दल मि यावेळीचा उमेदवार आहे आसा प्रचार केला पण माझा काँग्रेस ने विचारच केला नाही ऐनवेळी दुसराच उमेदवार देऊन माझ्यावर अन्याय केला म्हणून माझ्या कडे आनेकानी व्यथा मांडली मि समाजासोबत सदैव आहे म्हणून समाजाच्या भावनांचा आदर करुन नांदेड लोकसभा पोटनिवडणूकित उमेदवार म्हणून मा,जि.प.अध्यक्ष प्रतिनिधी अंनदराव गुंडीले तर बिलोली देगलुर विधानसभा मधुन मि स्वतः उमेदवारी आर्ज दाखल करणार आहे व बाकी ठिकाणाहून जे सक्षम उमेदवार आसेल त्याना उमेदवारी देऊन उभे करणार आसल्याचे मत यावेळी मा,आ,अविनाश घाटे यानी व्यक्त केले आहे.
या बैठकीत मुखेड-देगलुर चे माजी आ.अविनाश घाटे.माजी सनदी अधिकारी व्ही,जे.वरवंटकर.जि.प.माजी अध्यक्ष प्रतिनिधी आनंदराव गुंडीले.मा.जि,प सभापती प्रा.बाबुराव पवित्रे.मुखेड मा.नगरध्यक्ष गणपतराव गायकवाड.अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन अध्यक्ष सतिश कावडे.लोकस्वराज्य आंदोलन,संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भराडे.गणेश तादलापूरकर.सुर्यकांत तादलापूरकर.प्रा.सदाशिव भुयारे.राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान प्रा.देविदास इंगळे.शिवाजी नुरूंदे.एच बी.बोरगावकर.काँ.गंगाधर गायकवाड.चंद्रकांत घाटे.नागेश तादलापुरकर.राजेन्द्रं मंडगीकर.सुभाष अल्लापूरकर.यादवराव सुर्यवंशी.डाँ.मिलींद शिकारे.आनंदराव देगावकर.अँड.निलेश तादलापूरकर.गगांधर कावडे.शंकर गायकवाड.नामदेव कांबळे.माधव वाडेकर.काँ.अंबादास भंडारे.काँ.संतोष शिंदे.लक्ष्मण गायकवाड.डी.एन.मोरे.प्रल्हाद भंडारे.हाणमंत भाळेगावकर.गंगाधर राणवळकर.प्रकाश मुराळकर.प्राचार्य तथा सरपंच डाँ. मनोहर तोटरे अदि मातंग समाजाचे प्रमुख पदधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.