उद्या किनवट नगरपरिषद क्षेत्रातील विविध कामांचे भूमिपूजन आ.भीमराव केराम यांच्या हस्ते होणार
किनवट/प्रतिनिधी: किनवट/माहूर विधानसभेचे विकास पुरुष,कर्तुत्वान आमदार भीमराव केराम यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी 7.30 कोटी रुपये च्या कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा आमदार केराम यांच्या हस्ते होणार आहे.
1) यात प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिशु वाटिका येथे योगाभवन बांधणे व परिसर विकसित करणे.
2) प्रभाग क्रमांक 6 मध्ये कृष्ण मंदिर येथे पेपर ब्लॉक बसविणे.
3) प्रभाग क्रमांक 2 मध्ये सिद्धार्थ नगर येथे जेतवन बुद्ध विहार येथे समाज मंदिर बांधकाम करणे.
4) प्रभाग क्रमांक 2 मध्ये अण्णाभाऊ साठे नगर येथे मातंग समाजासाठी समाज मंदिर बांधकाम करणे.
5) प्रभाग क्रमांक 1 मध्ये अक्सा मजीद येथे पार्किंग पेपर ब्लॉक बसवणे.
6) प्रभाग क्रमांक 2 मध्ये हनुमान मंदिराला सभागृह बांधणे.
7) प्रभाग क्रमांक 1 मध्ये रामनगर येथील अंतर्गत सिसी रस्ते बांधकाम करणे.
8) प्रभाग क्रमांक 3 मध्ये गुरुकुल शाळेजवळ अंतर्गत रस्ते बांधकाम करणे.
9) प्रभाग क्रमांक 3 व 4 येथे अंतर्गत सीसी रस्ते बांधकाम करणे अशा विविध कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.